अनिल देशमुखांना जामीन मंजूर, पण CBI च्या भूमिकेमुळे तूर्त सुटका नाहीच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय दिला आहे. यापूर्वी ईडी केसमध्येही त्यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे देशमुख यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र CBI च्या भूमिकेमुळे देशमुखांच्या जामिनावर १० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. सीबीआय याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. त्यामुळे देशमुखांना तुरुंगातून बाहेर येण्यासाठी आणखी १० दिवसांची वाट पहावी लागणार आहे.

१०० कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी देशमुखांना १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. तसेच आठवड्यातून दोन दिवस देशमुखांना ईडी कार्यालयात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे. अनिल देशमुख यांचा जामीन मुंबई हायकोर्टाने मंजूर केला असला तरी या जामिनाला सीबीआय सर्वोच्च नायायालयात आव्हान देणार आहे. त्यामुळे देशमुखांच्या सुटकेचा निर्णय १० दिवसांनंतरच होणार हे स्पष्ट झाला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर 1 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीने त्यांना अटक केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने सुद्धा देशमुखांवर गुन्हा दाखल केला होता. मागील महिन्यात अनिल देशमुखांना ईडीच्या प्रकरणात उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता मात्र सीबीआय प्रकरणी जामीन मिळणं बाकी होत. आता आज त्यांना सीबीआय प्रकरणात सुद्धा जामीन मंजूर झाला आहे.