Mumbai Indians : मुंबई इंडियन्सला धक्का!! 3 खेळाडू संघ सोडणार

Mumbai Indians
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Indians आयपीएल इतिहासातील सर्वोत्कृष्ट संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने यंदाही आपला दमदार खेळ दाखवत प्ले ऑफ मध्ये धडक मारली आहे. सुरुवातीच्या सामन्यातील काही अपयशानंतर मुंबई पुन्हा एकदा लयीत आली. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात जबरदस्त खेळ दाखवत मुंबईने गुणतालिकेत चौथे स्थान पटकावलं आहे. मात्र प्ले ऑफच्या सामन्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. आत्तापर्यंत ज्या खेळाडूंनी मॅच विनिंग खेळी खेळून मुंबईला अनेक विजय मिळवून दिले ते ३ खेळाडू आता भर मोक्याच्या काळात मुंबई इंडियन्सची साथ सोडणार आहेत. रियान रिक्लेटन, विल जॅक आणि कार्बिन बॉश अशी या तिन्ही खेळाडूंची नावे आहेत.

रियान रिक्लेटन हा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) विकेटकिपर आणि सलामीवीर फलंदाज, डाव्या हाताने बॅटिंग करणाऱ्या रिक्लेटनने रोहित शर्माच्या साथीने मुंबईला अनेक सामन्यात मजबूत सलामी दिली आहे. पहिल्याच आयपीएल सीजन मध्ये रिक्लेटनने सर्वांचं लक्ष्य वेधून घेतलं. दुसरा मॅचविनर खेळाडू आहे तो विल जॅक्स, फलंदाजी असो वा गोलंदाजी, विल जॅकने प्रत्येक वेळी आपल्या अष्टपैलू खेळीने मुंबईला विजयी केलं. आणि तिसरा खेळाडू म्हणजे कार्बिन बॉश. मुंबईच्या संघाकडून (Mumbai Indians) त्याने भेदक गोलंदाजी केली होती. तसेच गरज पडेल तिथे बॅटिंग मध्येही त्याने योगदान दिले. मात्र आता प्ले ऑफ सामन्यापूर्वीच हे तिन्ही खेळाडू मुंबईचा संघ सोडणार असल्याचे आता समोर आले आहे.मुंबई इंडियन्सचे रियान रिक्लेटन आणि कार्बिन बॉश हे दोन्ही खेळाडू दक्षिण आफ्रिकेचे आहेत, तर विल जॅक्स हा इंग्लंडचा आहे. आता या दोन्ही देशांचे आंतरराष्ट्रीय सामने सुरु होणार आहेत. त्यामुळे हे तिन्ही खेळाडू प्ले ऑफच्या सामन्यात आपल्याला दिसणार नाहीत.

बदली खेळाडू म्हणून कोणाची निवड? Mumbai Indians

मुंबई इंडियन्सने विल जॅक्स, रायन रिक्लेटन आणि कॉर्बिन बॉश यांच्या जागी इंग्लंडचे जॉनी बेअरस्टो, रिचर्ड ग्लीसन आणि श्रीलंकेच्या चरिथ असलंका यांना संधी दिली आहे. जॉनी बेअरस्टो हा इंग्लंडचा आक्रमक सलामीवीर मानला जातो. बेअरस्टोला भारतीय खेळपट्ट्या आणि आयपीएल सामन्यांचा मोठा अनुभव आहे. बेअरस्टोने आयपीएलमध्ये 34.54 च्या सरासरीने आणि 144.45 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. रोहित शर्मासोबत तो सलामीला उतरू शकतो. रिचर्ड ग्लीसन हा जलदगती गोलंदाज आहे. तर चरिथ असलंका हा प्रथमच आयपीएल खेळताना दिसेल.