Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचे नाव बदललं; नीता अंबानींचा मोठा निर्णय

Mumbai Indians Oval Invincibles
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Indians । इंडियन प्रीमिअर लीग मधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. नीता अंबानी यांनी आपल्या टीमचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा बदल भारतात नव्हे तर इंग्लंड मधील स्पर्धेत होणार आहे. इंग्लंड मधील द हंड्रेड लीगच्या ओव्हल इनव्हिन्सिबल्स संघात अंबानी यांची 49 टक्के हिस्सेदारी आहे. याच संघाचे नाव पुढच्या हंगामापासून एमआय लंडन करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांना आणखी एक टीम मिळाली आहे.

नीता अंबानींनी (Nita Ambani) या वर्षाच्या सुरुवातीला 123 दशलक्ष युरोमध्ये ओव्हल इनव्हिन्सिबल्स संघातील 49 टक्के हिस्सा खरेदी केला होता. खरं तर ओव्हल इनव्हिन्सिबल्स संघाचे मूल्यांकन 123 दशलक्ष पौंड आहे. मुंबई इंडियन्सने 49 टक्के हिस्सा खरेदी केल्याने त्यांना 60 दशलक्ष पौंडांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. उर्वरित 51 टक्के हिस्सा अजूनही सरे काउंटी क्लबकडे आहे. द टेलिग्राफच्या अहवालानुसार, सरेला ओव्हल इनव्हिन्सिबल्सचे नाव मिळावे अशी इच्छा होती, तरीही, पुढील हंगामापासून संघाचे नाव एमआय लंडन असे बदलले जाईल.

मुंबईच्या ताफ्यात 6 वा संघ – Mumbai Indians

आयपीएल व्यतिरिक्त मुंबई इंडियन्सच्या नावाचे ६ जग जागतिक क्रिकेट स्पर्धेत खेळत आहेत. आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स, वूमन प्रीमिअर लीग मध्ये सुद्धा मुंबई इंडियन्सचा संघ आहे. परदेशात सुद्धा मुंबईने आपला डंका वाजवला आहे. अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) मध्ये मुंबई इंडियन्सची न्यूयॉर्क टीम (Mi New York) आहे. दक्षिण आफ्रिकेच्या SA 20 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) (MI Cape town) टीम आहे. आंतरराष्ट्रीय लीग टी20 (ILT 20) मध्ये एमआय एमिरेट्स (MI Emirates) नावाने मुंबईचा संघ आहे. आता इंग्लंडच्या द हंड्रेड लीगमध्ये पुढच्या वर्षीपासून तुम्हाला एमआय लंडन (MI London) हा संघ बघायला मिळेल. आंतराष्ट्रीय स्तरावर मुंबईचा संघ वेगवेगळ्या स्पर्धा खेळत असल्याने मुंबई इंडियसच्या चाहत्यांसाठी क्रिकेटची ही खरीखुरी मेजवानीच म्हणावी लागेल.