Mumbai Local : मुंबईची लाईफ लाईन म्हणून लोकलची ओळख आहे. दररोज हजारो लोक लोकल ने प्रवास करत असतात. केवळ मुंबईतच नाही तर अनेक उपनगरेही लोकल द्वारे मुंबईशी कनेक्ट करण्यात आलेली आहेत आणि म्हणूनच तुम्ही जर येथे दोन दिवसात उपनगरातून लोकल द्वारे प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. करण उपनगरीय रेल्वे मार्गावर आज शुक्रवार दिनांक 10 जानेवारी आणि रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या दोन्ही दिवसात लोकलचा प्रवास करायचा विचार करत असाल तर आधी वेळापत्रक पहा आणि मगच घराबाहेर पडा. चला तर जाणून घेऊया नक्की काय वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे आणि उपनगरातील कोणत्या मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
म्हणून घेण्यात येणार ब्लॉक…
दिनांक 10 आणि दिनांक 12 या दोन्ही दिवशी दिवसा कर्जत स्थानकावर पोर्टल उतरवण्यासाठी विशेष ट्राफिक आणि फ्लॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वे कर्जात यार्ड सुधारणा संदर्भात कर्जत स्थानकावरील पोर्टल लोडिंग चे काम पूर्ण करण्यासाठी विशेष ट्राफिक आणि पावर ब्लॉक परिचलित केला जाणार आहे. हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावा असं आवाहन मध्य रेल्वे कडून याबाबत करण्यात आलं आहे.
पहिला ब्लॉक
मध्य रेल्वेचा हा पहिला ब्लॉक दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी शुक्रवारी असणार आहे. या ब्लॉकचा कालावधी 11:20 ते 13 वाजून पाच मिनिटांपर्यंत असेल हा ब्लॉग एक तास 25 मिनिटांचा असेल
वाहतूक ब्लॉक
भिवपुरी रोड आणि पळसधारी स्थानकांदम्यान अप डाऊन आणि मिडलाईन ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे संचलन कसे राहील ते आता पाहूया. ब्लॉक कालावधीत नेरळ ते खोपोली दरम्यान उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी साडेनऊ ते अकरा वाजून १४ दरम्यान कर्जतसाठी सुटणाऱ्या गाड्या नेरळ येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील. तर कर्जत इथून सकाळी 11:19 ते दुपारी एक वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी सुटणाऱ्या गाड्या नेरळ येथून शॉर्ट ओरिजिनेट करण्यात येतील. याबरोबरच 11014 कोईमतुर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस कर्जत पनवेल मार्गे वळवली जाईल आणि कल्याण येथे उतरू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी पनवेल इथे थांबेल.
तिसरा ब्लॉक
रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी हा ब्लॉग असून या ब्लॉगचा कालावधी १३. ५० वाजता ते 15 35 वाजता पर्यंत असेल. ये ब्लॉक अंतर्गत पळसदरी आणि भिवपुरी रोड स्थानकांदरम्यान अपडाऊन आणि मिडलाईन वगळून गाड्यांचे संचलन केलं जाईल
ब्लॉक दरम्यान बदलापूर आणि खोपोली स्थानक दरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून १२. २० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -खोपोली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 13.19 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कर्जत उपनगरी गाडी अंबरनाथ शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३ वाजून 40 मिनिटांनी सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कर्जत उपनगरी गाडी बदलापूर येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.
कर्जत इथून 13 वाजून 55 मिनिटांनी सुटणारी कर्जत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि खोपोली इथून 13 वाजून 48 वाजता सुटणारी खोपोली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन अंबरनाथ येथून सुटेल.
याबरोबरच कर्जत इथून 15 वाजून 26 मिनिटांनी सुटणारी कर्जत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही गाडी बदलापूर इथून सुटेल.