उद्या रविवार आहे. त्यामुळे जर तुम्ही कुठे बाहेर जाण्याचा प्लान करत असाल तर मुंबईकरांनो एकदा या बातमीवर नक्की लक्ष द्या. कारण उद्या रेल्वेच्या तिन्ही लोकल मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होणार आहे. त्यामुळे जर उद्या तुम्ही बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर एकदा हे वेळापत्रक पहा आणि मगच बाहेर पडा. रेल्वे लाईनवर कशाप्रकारे ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे कोणत्या गाड्यांवर परिणाम होणार आहे चला जाणून घेऊया…
रुळांच्या देखभाल दुरुस्तीकरिता मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी दिनांक 10 नोव्हेंबर रोजी माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी दरम्यान मेगाब्लॉक घोषित करण्यात आलाय. तर पश्चिम रेल्वे कडून माहीम ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक घोषित करण्यात आलाय. या ब्लॉग दरम्यान रेल्वे रुळांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वे
स्थानक- माटुंगा ते मुलुंड मार्ग अप आणि डाउन जलद वेळ – सकाळी ११.३० ते दुपारी ३.०५ परिणाम ब्लॉकमुळे जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यांमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे
स्थानक- सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रे मार्ग अप आणि डाउन वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० परिणाम – सीएसएमटी ते वाशी / नेरूळ/पनवेल आणि सीएसएमटी ते वांद्रे गोरेगाव दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पनवेल कुलां दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. बेलापूर-खारकोपर-उरण मार्गावरील लोकल फेऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.
पश्चिम रेल्वे
स्थानक- माहीम ते गोरेगाव हार्बर मार्गावरील मार्ग अप आणि डाउन धीमा वेळ – सकाळी ११.०० ते दुपारी ४,०० परिणाम – ब्लॉक वेळेत चर्चगेट ते गोरेगाव, सीएसएमटी-वांद्रे, सीएसएमटी ते पनवेल, सीएसएमटी ते गोरेगाव दरम्यान मार्गावरील अप आणि धीम्या लोकल रद्द राहणार आहेत. ब्लॉकमुळे काही लोकल विलंबाने धावणार आहेत.