Mumbai Local Train : मुंबई लोकल होणार आणखी वेगवान ; 105 km/hr वेगाने धावणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल (Mumbai Local Train) ही मुंबईकरांसाठी  जीवनवाहिनी  समजली  जाते. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलच्या माध्यमातून आपल्या कामाच्या ठिकाणी प्रवास करत असतात . मुंबई उपनगरातून  लाखो लोकांचा लोंढा दरदिवशी मुंबईत येतो आणि परत जातो. मुंबई  उपनगरातील लोकांचा  मुंबईत  येण्याचा प्रवास आणखी सोपा व्हावा या दृष्टीने मध्य रेल्वेने मुंबई लोकलचा वेग ताशी 105 km/hr करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाश्यांचा वेळ वाचणार आहे.

नेरूळ – खारकोपर दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढवणार :

मध्य रेल्वेवरील पायाभूत कामांची पूर्तता करण्यात येत आहे. त्याचबरोबर रेल्वे रूळांचे सक्षमीकरण आणि इतर कामे पूर्ण करून, लोकलचा वेग वाढवला जाणार आहे. यासाठी हार्बर, ट्रान्स हार्बर, कर्जत-खोपोली या दरम्यान  मध्य रेल्वेच्या माध्यमातून काम प्रगतीपथावर असून भविष्यातील या मार्गांवर लोकलचा वेग वाढवण्यात येणार आहे. नेरूळ – खारकोपर दरम्यान लोकलच्या फेऱ्या (Mumbai Local Train)  वाढवण्यात येणार आहेत.

लोकलच्या विविध मार्गांवरील वेग वाढवणार : (Mumbai Local Train) 

हार्बर मार्गावरील टिळक नगर ते पनवेल 33 किमीच्या मार्गावर, ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी 18 किमीच्या मार्गावर आणि नेरूळ ते खारकोपर 9 किमीच्या मार्गावर सध्याचा लोकलचा ताशी 80 किमी वेग ताशी 105 किमीपर्यंत वाढवण्यासाठी कामे सुरू आहेत. कर्जत-खोपोली 15 किमी मार्गावरून ताशी 60  किमी वेगाने धावणाऱ्या लोकलचा वेग ताशी 90 किमी करण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या लोकलच्या वाढत्या वेगामुळे (Mumbai Local Train) प्रवाश्यांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच त्यांचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे ही एक आनंदाची बातमी समजली जातीये.