मुंबई लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार; स्वतंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला ‘त्या’ कॉल ने पोलीस अलर्ट मोडवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) सीरियल बॉम्बस्फोट होणार असल्याचा निनामी कॉल पोलिस नियंत्रण कक्षाला आला असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या कॉल नंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. देशाचा स्वातंत्र्यदिन अगदी जवळ आला असतानाच धमकीच्या या फोनमुळे पुन्हा एकदा मुंबई दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असलयाचे दिसत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धमकीचा कॉल आला. समोरील व्यक्तीने म्हंटल कि, मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे. कॉलरने आपण जुहू येथिल विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचा दावा केला आणि नंतर त्याचा फोन बंद केला. नियंत्रण कक्षात कॉल अटेंड करणार्‍या महिला पोलिसांनी सदर व्यक्तीकडून अजून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. नेमका कोणत्या ट्रेनमध्ये बॉम्ब आहे असा सवाल त्याला केला असतं त्याने काहीही उत्तर दिले नाही. आणि फोन कट केला.

या अज्ञात व्यक्तीच्या धमकीच्या कॉल नंतर पोलीस यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सदर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन चेक केलं असता विले पार्ले परिसरातूनच त्याने कॉल केल्याचे स्पष्ट झालं. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आल्याचे समोर येत आहे. यापूर्वी सुद्धा जुलै महिन्यात अशाच प्रकारे धमकीचा फोन मुंबई पोलिसाना आला होता, तेव्हा संबंधित कॉलरने मुंबईत पुन्हा एकदा २६/ ११ सारखा हल्ला होणार असल्याचे म्हंटल होते.