Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी गुडन्यूज!! आता हार्बर मार्गाचा विस्तार बोरवलीपर्यंत होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आली आहे. वाढत्या प्रवाशांच्या गर्दीमुळे पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गाचा बोरवलीपर्यंत दोन टप्प्यात विस्तार करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. (Mumbai Local Train) या मार्गांचे काम पूर्ण झाल्यानंतर बोरवली पर्यंत जाण्यासाठी पश्चिम रेल्वे व हर्बल रेल्वे असे दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत. महत्वाचे म्हणजे, यासाठी पुढील मे महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन रेल्वेने आखले आहे. तसेच हा मार्ग बनवण्यासाठी 825 कोटी रुपये खर्च होतील, असा ढोबळ अंदाज काढण्यात आला आहे.

हार्बर ट्रेन बोरिवलीपर्यंत धावणार (Mumbai Local Train)

सध्या दिवसेंदिवस मुंबईची लोकसंख्या वाढत चालली आहे. यात एप्रिल 2023 ते मार्च 2024 या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेवरील (Mumbai Local Train) प्रवाशांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. हे प्रवासी सर्वाधिक बोरिवली ते विरार दरम्यान प्रवास करणारे आहेत. ही बाब लक्षात घेऊनच हार्बर ट्रेन बोरिवलीपर्यंत चालवण्याचा विचार रेल्वे विभागाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे हार्बर विस्तारीकरण पूर्ण करण्यासाठी गोरेगाव ते मालाड (2 किमी) आणि मालाड ते बोरिवली (6 किमी) असा मार्ग पूर्ण केला जाणार आहे.

आताच्या घडीला हार्बर सेवा ही फक्त शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगावपर्यंत सुरू आहे. परंतु आता गोरेगाव ते मालाडचा पहिला सन 2026 ते 27 या कालावधीत तर मालाड ते बोरिवली दुसरा टप्पा सन 2027 ते 28 या कालावधी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आली आहे. ज्यासाठी 825 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. या कामाला प्रत्यक्षात सुरुवात जून महिन्याच्या अगोदर करण्यात येईल अशी माहिती व वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान सध्या बोरवलीपर्यंत हार्बर विस्तारीकरणाचे प्राथमिक काम पूर्ण करण्यात आले आहे. यात भू-तांत्रिक तपासणी, सर्वेक्षण, बाधित बांधकामे व झाडांचे ड्रोन सर्वेक्षण अशा कामांचा समावेश आहे. (Mumbai Local Train) हार्बर विस्तारीकरणासाठी 20 ठिकाणी 1,900 चौरस मीटर जागेची गरज असणार आहे. यातील 1740 चौरस मीटर खासगी जागेची संपादनाची प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू आहे. या विस्तारीकरणामुळे गोरेगाव-मालाड, कांदिवलीतील,मालाड येथील एकूण 24 खाजगी इमारती पाडण्यात येणार आहेत.