Mumbai Local : मुंबईकरांना असली कसली जीवघेणी घाई; AC लोकल मधील Video व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल (Mumbai Local) आणि गर्दी असे अतूट नाते आहे. जगात अश्या गर्दीला तोड नाही असे म्हंटल तरी वावगे ठरणार  नाही. ह्याच गर्दीत नवनवीन आणि आश्चर्यकारक  घटना  घडत  असतात आणि घडलेल्या घटना नेहमीच समाज  माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात. अश्याच प्रकारच्या एका घटनेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या विडिओ मध्ये लोकल ट्रेन मध्ये चढताना मुंबईकरांची जीवघेणी घाई पाहायला मिळत आहे.

काय आहे विडिओ मध्ये- Mumbai Local

मुंबई लोकल मध्ये सुधारणा व्हावी या उद्देशाने सरकारने मुंबई लोकलमध्ये AC लोकलचा पर्याय सुचवला. त्यातूनच मुंबईमध्ये AC लोकल सुरु करण्यात आल्या. पण सर्व AC लोकलचे दरवाजे हे आपोआप बंद होतात आणि आपोआप उघडतात . मुंबईकरांना लोकल फलटावर लागण्याच्या अगोदरच  रेल्वेच्या डब्यात चढण्यासाठी  तयार असतात . हीच सवय  मुंबईकर AC लोकल मध्ये अमलात आणताना दिसत  आहेत. असाच एक विडिओ व्हायरल झाला आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये लोकल  फलटावर लागण्याच्या काहीच क्षणात फलाटवरील लोक लोकलचे  दरवाजा आपोआप उघडत  असताना  देखील  बळजबरीने  उघण्याचा  प्रयत्न करताना  दिसून येत आहे. लोकलच्या डब्यात बसलेला युवक फलाटवरील लोकांना ट्रेनचे दरवाजे आपोआप उघडतात हे सांगण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आपल्या जुन्या सवयीमुळे मुंबईकर जागेसाठी दरवाजा उघडण्याच्या आधीच आत मध्ये शिरताना दिसून येत आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे. यातून मुंबई  लोकल (Mumbai Local) आणि गर्दी हे समीकरण लक्षात येत आहे. अफाट गर्दीमुळे बसायला न मिळणारी जागा आणि रोजचा संघर्षच यातून दिसून येतो. तसेच मुंबईकर नवीन  गोष्टी किती सहजतेने स्वीकारताना दिसतात हे ही यातून पाहायला मिळते. अश्याच गोष्टीमुळे सरकारदेखील लोकलचा विकास करायला कचरते की काय हेच  दिसून येते आहे.