व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

घाटकोपरमध्ये भीषण अपघात! ओला गाडीची 8 जणांना धडक

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबई येथील घाटकोपर मध्ये सुधा पार्क परिसरात भीषण अपघात (accident) झाल्याची घटना घडली आहे. हि संपूर्ण अपघाताची (accident) घटना कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. या अपघातात (accident) ओला गाडीने आठ जणांना धडक दिली आहे. तर त्यातील जखमी झालेल्यांपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

जेव्हा हा अपघात झाला तेव्हा समोरून येणाऱ्या एका गाडीच्या कॅमेरात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. या व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी रस्त्यावरून जात आहेत तेवढ्यात भरधाव वेगाने येणाऱ्या ओला गाडीने सर्वप्रथम तीन रिक्षा, एक टेम्पो आणि दोन बाईकला धडक दिली. या अपघातात एकूण आठ जण जखमी झाले (accident) आहेत तर दोन जणांची प्रकृती सध्या गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ओला गाडी चालकाचे नाव राजू यादव असल्याचे समोर आले आहे. हा चालक त्याच परिसरातील रहिवासी असल्याचेही सांगितले जात आहे. या अपघातानंतर (accident) घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी या चालकाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या अपघाता प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अजून समजू शकलेले नाही.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!