Mumbai Metro : मुंबईकरांसाठी खुशखबर ! धावणार आणखी एक मेट्रो ; कसा असेल मार्ग ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Metro : मुंबई ही राज्याची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेची मोठी महत्वाची भूमिका आहे. त्यातही लोकल म्हणजे मुंबईची जीवनवाहिनी. शासनामार्फत लोकलचा विस्तार केला जातो आहे . मात्र तरीही लोकलची गर्दी काही कमी होत नाही. मात्र मुंबईकरांना मेट्रो मोठीच दिलासादायक ठरताना दिसत आहे. लोकलची गर्दी टाळण्यासाठी अनेकजण मेट्रोने (Mumbai Metro) प्रवास करणे पसंत करीत असल्याचे पाहायला मिळते. त्यादृष्टीने आता मुंबईत मेट्रोचे जाळे विस्तारण्यात येत आहे.

मुंबईकरांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे MMRDA कडून डी.एन.नगर ते मंडाळे मेट्रो 2ब मार्गिकेचा चेंबूर डायमंड मार्केट ते मंडाले हा पहिला टप्पा सुरू होऊ शकतो. त्यासाठी मानखुर्द येथील उपनगरीय रेल्वे मार्गावर रविवारी गर्डर उभारण्याचे काम MMRDAकडून पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळं लवकरच ही मेट्रो सुरू (Mumbai Metro) होऊ शकते.

मानखुर्द येथील रेल्वे मार्गिकेवरुन मेट्रो 2ब मार्गिका जाणार आहे. मंडाले डेपो आणि चेंबूरदरम्यान ही मार्गिका आहे. शहराच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यात येणार आहे. संपूर्ण मेट्रो मार्गिकेचे दोन भागात विभाजन करण्यात आलं आहे. 2A आणि 2B हा मार्ग दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम, डीएन नगर आणि अंधेरी पश्चिम डीएन नगर ते मंडाले डेपो असा आहे. मेट्रो लाइन 2B ची लांबी 24 किमी असून या मार्गावर 20 स्थानके असणार आहेत. या मेट्रो प्रकल्पाचा खर्च 10,986 कोटी इतका (Mumbai Metro) असणार आहे.

‘या’ स्थानकांचा समावेश (Mumbai Metro)

ईएसआयसी नगर, प्रेम नगर, इंदिरा नगर, नानावटी हॉस्पिटल, खिरा नगर, सारस्वत नगर, नॅशनल कॉलेज, वांद्रे मेट्रो, आयकर कार्यालय, आयएलएफएस, एमटीएनएल मेट्रो, एसजी बर्वे मार्ग, कुर्ला (पू), ईईएच चेंबूर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द, मंडाले मेट्रो अशी स्थानकं या मार्गावर असणार आहेत. मेट्रो 2Bचा डेपो मंडाला येथे असणार आहे.