Mumbai Metro : मुंबईकरांना मिळणार नवीन मेट्रो; कसा असेल रूट जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Metro | मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांना नवीन मेट्रो मार्ग मिळणार आहे. मुंबईचे ट्रॅफिक कमी करण्यासाठी मेट्रोचा मार्ग निवडला जात आहे. कल्याण- तळोजा मेट्रो 12 मार्गिकेचे काम लवकरच सुरु होणार असून या नवीन मेट्रो मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास सोयीचा होणार आहे. लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे लोकल सुद्धा प्रवाश्यांनी तुडुंब भरलेली असते. या होणाऱ्या गर्दीमुळे अनेक अपघात देखील होतात. यावर उपाय म्हणून मेट्रोचा विस्तार करण्यात येत आहे. कल्याण – तळोजा मेट्रो 12 या नवीन होणाऱ्या मार्गामुळे मुंबईकरांचा ठाणे प्रवास हा जलद होणार आहे.

कारशेडसाठी प्रसिद्ध करण्यात आली 1 हजार 877 कोटी रुपयांची निविदा

कल्याण – तळोजा मेट्रो मार्गाचे (Mumbai Metro) काम लवकर करण्यासाठी आवश्यक असलेल्या कारशेडसाठी तब्बल 1 हजार 877 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे मार्गीकेचे काम लवकर पूर्ण होणार असून लवकरच दुसरा मेट्रो मार्ग मुंबईला मिळणार आहे. या नवीन होणाऱ्या मेट्रो मार्गामुळे सर्वसामान्य लोकांना याचा फायदा होणार आहे. हा मेट्रो मार्ग एकूण 12 ते 20 किलोमीटरचा असून या मार्गासाठी 5600 कोटी रुपयांचा खर्च येईल. तसेच हा मार्ग 2025 पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले जातेय.

कोणत्या ठिकाणाला जोडला जाईल हा मेट्रो मार्ग- Mumbai Metro

नवीन मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई, मुंबई ही स्थळे मेट्रोने जोडली जातील. तर कल्याण, एपीएमसी कल्याण, गणेश नगर, पिसवली गाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटने, कोलेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकलन, तुर्भे, पिसर्वे आगार, पिसर्वे, अमनदूत या स्थानकाचा या नव्या मेट्रो मार्गामुळे (Mumbai Metro) नव्याने विकास होणार आहे.