Mumbai Pune Expressway : मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर आज 2 तासांचा ब्लॉक; पर्यायी मार्ग कोणते ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Pune Expressway | पुणे – मुंबई या द्रुतगती मार्गावर रोजचे लाखो लोक प्रवास करतात. त्यामुळे येथील वाहतुकीचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. परंतु, आज यां मार्गावर दोन तासाचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ट्रॅफिक ब्लॉक नेमका कोणत्या वेळेत असेल आणि त्यामुळे या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणता असेल? याबाबत आज आपण जाणून घेऊयात.

का ठेवण्यात येणार ट्रॅफिक ब्लॉक?

महामार्गाचे राज्य पोलीस अधिकारी योगेश भोसले यांनी हा ट्रॅफिक ब्लॉक जारी केला आहे. मुंबई लेनवर हा ब्लॉक दोन तासाचा असणार आहे. इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ITMS) प्रकल्पाचा भाग म्हणून या मार्गावर गॅन्ट्री बसवल्यामुळे हा ट्रॅफिक ब्लॉक ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक नियंत्रण आणि वाहतूक सुरक्षितता वाढली जाणार आहे.

कोणत्या वेळेत होणार ब्लॉक? Mumbai Pune Expressway

पुणे – मुंबई या एक्सप्रेसवरील (Mumbai Pune Expressway) हा ब्लॉक आज दुपारी 1:30 ते 3:30 वाजेपर्यंत होणार आहे. यामध्ये हलकी, जड आणि मल्टी-एक्सेल वाहने चालवण्यास मनाई आहे. तसेच द्रुतगती मार्गाच्या मुंबई कॅरेजवेवर 29.40 किमी आणि 9.80 किमी अंतरावर दोन लेन सेवायोग्य गॅंट्री उभारण्यात येणार आहेत.

कोणत्या पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली आहे वाहतूक?

मुंबई – पुणे एक्सप्रेसवे वरील दोन तासाच्या यां ट्रॅफिक ब्लॉकमुळे वाहतुकीचा खोळंबा होणार आहेच त्यासोबतच प्रवाश्यांचा वेळही वाया जाणार आहे. त्यामुळे पुणे – मुंबईची हलकी वाहतूक तसेच प्रवासी बस खोपोली एक्झिटमधून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (NH48) वळवल्या जाणार आहेत. तसेच शेडुंग टोल प्लाझाच्या दिशेने मुंबईकडे प्रवास करता येणार आहे.

अवजड वाहणासाठी जुना मुंबई-पुणे महामार्ग आहे पर्याय

पुणे – मुंबई एक्सप्रेसवे (Mumbai Pune Expressway) वरील हलकी, जड वाहतूकीला मनाई असल्यामुळे ही जड वाहने ही आणि मल्टी-एक्सेल वाहने ही जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या दिशेने वळवली जातील. पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी आणि जड वाहनांची वाहतूक खालापूर एक्झिटमधून वळवली जाणार आहे आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 म्हणजेच खालापूर शहरापासून जुना असलेला पुणे मुंबई महामार्ग घेऊन शेडुंग टोल प्लाझा मार्गे मुंबई लेनने पुढे जाता येणार आहे.