Mumbai Pune Expressway : मुंबई- पुणे महामार्गावर आज 2 तासांचा ब्लॉक; या वेळेत वाहतूक बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई – पुणे महामार्गाने (Mumbai Pune Expressway) प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे येथील वाहतूकही तितकीच अधिक आहे. जर तुम्ही आज यां मार्गाने जाणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. मुंबई – पुणे दृतगती मार्गावर MMRDC ने दोन तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. हा मेगा ब्लॉक 12 ते 2 यावेळेस होणार असून तो 35/500 किलोमीटर पर्यंत राहणार आहे. त्यामुळे मुंबईकडून पुण्याला जाणारा रस्ता हा पूर्णपणे बंद असणार आहे. याची दखल प्रवाश्यांनी घ्यावी असे MMRDC कडून सांगण्यात आले आहे.

का घेतला जाणार मेगा ब्लॉक?

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai Pune Expressway) सध्या काम सुरु असून ते 35/500 किलोमीटर पर्यंतचे आहे. यां मार्गावर ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गँट्री बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे हा दोन तासाचा मेगा ब्लॉक करण्याचा निर्णय MMRDC ने घेतला आहे. 2 तासानंतर ही वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतुकीला पर्यायी मार्गाकडे वळवण्यात आले आहे.

कोणता आहे पर्यायी मार्ग? Mumbai Pune Expressway

मुंबईकडून पुण्याला जाणाऱ्या हलक्या वाहणांची वाहतूक ही शेडुंग फाटा इथून राष्ट्रीय महामार्ग 48 जुना असा वळवण्यात आला आहे. मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील शिंग्रोबा घाटातील मार्गाच्या साहाय्याने मॅजिक पॉइंट येथे पुन्हा मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर मार्गस्थ करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासी यां दोन तासात या मार्गाचा वापर करू शकतात.

340 कोटींचा आहे प्रकल्प-

मुंबई – पुणे द्रूतगती मार्गावर होणाऱ्या सततच्या अपघातास आटोक्यात आणण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यासाठी 340 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. या प्रकल्पामुळे होणारे अपघात टाळले जातील अशी आशा व्यक्त केली जात आहे.