Mumbai Pune Expressway आज ‘या’ वेळेत बंद राहणार; प्रवासापूर्वी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग (Mumbai Pune Expressway)  महाराष्ट्रसाठीचा आर्थिक कणा समजला  जातो. रोज लाखभर  वाहने मुंबई – पुणे असा प्रवास करत असतात. मात्र ह्या द्रुतगती महामार्गावर  दिवसेंदिवस वाढती वाहतूककोंडी लक्षात घेता द्रुतगती महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतरही लहानमोठी कामे या महामार्गावर  चालूच  असतात . अश्याच कारणासाठी आज दुपारी 12 ते 2 पर्यंत मुंबई पुणे एक्सप्रेस वे बंद राहणार आहे.

कुठे असणार एक्सप्रेसवे बंद :

मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वरीलअमृतांजन पुलापासून ते खंडाळा  बोगद्यापर्यंत ही वाहतूक बंद असेल. ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार असल्यामुळे याठिकाणी वाहतूक बंद असेल. किलोमीटर स्वरूपात बघायचे  झाल्यास 45 ते 45 किलोमीटर दरम्यान वाहतूक बंद  असेल. त्यामुळे हलक्या वाहनांची वाहतूक जुन्या मुंबई – पुणे महामार्गांवर वळवण्यात येणार आहे. तर मुंबईकडून येणारी अवजड वाहने खालापूर टोल नाक्यावरच थांबवली जातील. आज मंगळवारी 10 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12:00 ते 2:00 दरम्यान बंद असणार आहे.

पुणे – मुंबई मार्गीका सुरु राहणार :

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग जरी दुपारी 12:00 ते 2:00 बंद  असला तरी पुण्यावरून मुंबईला जाण्यासाठीची मार्गीका सुरु असणार आहे. त्यामुळे पुण्यातील प्रवाशी मुंबईला सहजतेने  प्रवास करू शकतात . 2 तासाच्या विशेष ब्लॉकचा परिणाम  फक्त मुंबईवरून पुण्याकडे येणाऱ्या वाहतुकीवर होताना दिसून येणार आहे. त्यामुळे मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गांवर दुपारनंतर वाहतूककोंडीची समस्या  उद्भवू  शकते .

Missing link project वर काम सुरु :

वाढती  वाहनांची  संख्या पाहता सरकारने  घाटात  होणारी वाहनांची  कोंडी कमी  करण्यासाठी  missing link project वर  काम सुरु केले आहे. Missing link project च्या माध्यमातून घाटात  होणारी वाहतूक कोंडी नाहीसी होईल. कारण  वाहनांना पर्यायी सुविधा missing link च्या माध्यमातून  मिळेल. या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रवासाचा वेळ देखील  वाचेल .त्याचबरोबर रुंदीकरनाचे काम देखील  2026 पर्यंत पुर्ण होईल असा अंदाज आहे. त्यामुळे मुंबई – पुणे प्रवास भविष्यात अधिक  सुखकर होईल.