मुंबई- पुणे प्रवास महागणार; Expressway वरील टोल दरांत मोठी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या आर्थिक वर्षात सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. मुंबई ते पुणे प्रवास आता आणखी महागणार आहे. याचे कारण म्हणजे, मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील (Mumbai-Pune Expressway) टोलच्या किंमतीत तब्बल 18 टकक्यांनी वाढ होणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून ही दरवाढ करण्यात येणार आहे.

2004 साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलमध्ये दर 3 वर्षांनी 18 टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार, 2023 मधील टोलच्या दरात वाढ होत आहे. याआधी 1 एप्रिल 2020 मध्ये अशीच वाढ झाली होती. मात्र 1 एप्रिल 2023 ला लागू होणारे टोलचे दर हे 2030 पर्यंत कायम असतील, असं MSRDC कडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे इथून पुढे मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करताना जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहेत.

नव्या दरानुसार, नव्या दरांनुसार चारचाकीचा टोल 270 रुपयांवरून 316 रुपये होणार आहे. तर, बससाठी टोलचा 795 वरुन 940 रुपयांवर जाणार आहे. ट्रकसाठी 580 रुपयांवरून 685 रुपये मोजावे लागणार आहे. तर टेम्पोसाठी 420 रुपयांऐवजी 495 रुपये इतका टोल द्यावा लागणार आहे. थ्री एक्सेलसाठी 1380 वरून 1630 रुपये टोल होणार आहे तर एम एक्सेल साठी 1835 ऐवजी 2165 रुपये मोजावे लागतील.