Mumbai-Pune Shivneri : मुंबई – पुणे प्रवास होणार कमी वेळात ; अटल सेतूवरून धावणार 15 शिवनेरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai-Pune Shivneri : मुंबई – पुणे असा प्रवास करणाऱ्यांची काही कमी नाही. त्यातही सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्यामुळे ट्रेन , बस अशा सर्वच गाडयांना गर्दी पाहायला मिळते. तुम्ही देखील उन्हाळयाच्या सुट्टीत पुणे -मुंबई असा प्रवास करणार असाल तर तुम्ही प्रवासाची चिंता करू नका. कारण राज्य परिवहन महामंडळाने शिवनेरी फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. त्यातही अटल सेतूमार्गे धावणाऱ्या शिवनेरीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय परिवहन मंडळाने घेतला असून मुंबई-पुणे अटल सेूतुवरुन शिवनेरीच्या 15 फेऱ्या धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवासही (Mumbai-Pune Shivneri) सुखकर होणार आहे.

मुंबई – पुणे या मार्गावर प्रवेशनाची होणारी (Mumbai-Pune Shivneri) गर्दी लक्षात घेऊन परिवहन मंडळाने हा निर्णय घेतला आहे. शिवाय हा प्रवास अटल सेतू वरुन होत असल्यामुळे ट्रॅफिकचा सामना करावा लागत नाही. अटल सेतूमुळं मुंबई-पुणे प्रवास 3.30 तासात पूर्ण होतो. पूर्वी या प्रवासाला 4.30 तास लागायचे. त्यामुळं अटलसेतूमार्गे धावणाऱ्या शिवनेरीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, अशी मागणी होत होती. प्रशासनानेही यावर लक्ष देत शिवनेरीच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे.

एका तासाची होते बचत (Mumbai-Pune Shivneri)

मुंबई पुणे मार्गावर दररोज अर्ध्या तासाच्या फरकानं शिवनेरीच्या एकूण 43 फेऱ्या धावतात. मुंबईवरून पुणे जाताना शेवडी अटल सेतू, गव्हाण फाटा, कोन यशवंतराव चव्हाण दुर्गती मार्गे शिवाजीनगर पुण्याकडे रवाना होतात यामुळे प्रवाशांची एक तासाची बचत होते असं एसटी प्रशासना कडून (Mumbai-Pune Shivneri) सांगण्यात आलं आहे.

काय असेल वेळापत्रक? (Mumbai-Pune Shivneri)

दादर वरून स्वारगेट साठी पहिली शिवनेरी पहाटे पाच वाजता सुटते.
स्वारगेट वरून दादासाठी पहिली शिवनेरी पहाटे पाच वाजता सुटते.
मंत्रालय ते पुणे रेल्वे स्थानक ही शेवटची शिवनेरी रात्री अकरा वाजता सुटते.

किती असेल भाडे ?

जर तुम्हाला दादर ते शिवाजीनगर असा प्रवास करायचा असेल तर त्या करिता 535 रुपये भाडं (Mumbai-Pune Shivneri) आकारण्यात येत आहे. जर तुम्हाला स्वारगेट ते दादर असा प्रवास करायचा असेल तर 535 रुपये आणि पुणे ते मंत्रालय असा प्रवास करायचा असेल तर 555 रुपये आकारण्यात येत आहे.