Mumbai Pune Travel : अटल सेतूवरून इलेक्ट्रीक शिवनेरी धावणार सुसाट; मंत्रालय ते स्वारगेट प्रवास सुखकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Pune Travel : शिवडी ते न्हावाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरत आहेच पण हा सेतू मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी देखील मह्तवपूर्ण ठरतो आहे. कारण या पुलामुळे वेळ वाचतो आहे शी प्रवासही आरामदायी होतो आहे. त्यामुळे या मार्गावरन धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवनेरी गाडीला (Mumbai Pune Travel) देखील चांगला फायदा होतो आहे. शिवाय या गाडयांना देखील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हीच बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने स्वारगेट मंत्रालय – स्वारगेट अशी इलेक्ट्रीक शिवनेरी बस सेवा सुरू केली आहे. चला जाणून घेऊया एस टी महामंडळाच्या या सेवेबद्दल …

आठवड्यातून दोन वेळा धावणार (Mumbai Pune Travel)

यापूर्वी देखील एसटी महामंडळाकडून शिवनेरीची सेवा सुरु करण्यात आली आहे. या एस टी बस ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. म्हणूनच एसटी महामंडळाने स्वारगेट मंत्रालय – स्वारगेट (Mumbai Pune Travel) अशी इलेक्ट्रीक शिवनेरी बस सेवा सुरू केली आहे. आठवड्यातून दोन दिवस म्हणजे दर सोमवारी आणि शुक्रवारी ही बस धावणार आहे.

मुंबई पुणे प्रवास कमी वेळात (Mumbai Pune Travel)

एसटी महामंडळाच्या अधिकऱ्याने याबाबत मध्यमनाशी बोलताना सांगितले की, अटल सागरी सेतूमुळे मुंबई-पुणे प्रवास 40 मिनिटांनी कमी होत असल्याने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी मंत्रालय-स्वारगेट शिवनेरी बस सेवेची मागणी केली होती. त्यानुसार ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

काय असेल तिकीट दर ?

या बसच्या वेळापत्रकाबद्दल बोलायचं झाल्यास सोमवारी सकाळी सहा वाजता स्वारगेट होऊन मंत्रालयासाठी ही बस निघणार आहे. तर शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता मंत्रालयाहून स्वारगेट साठी ही गाडी निघेल. या गाडीसाठी महिलांना (Mumbai Pune Travel) आणि 65 ते 75 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरामध्ये 50% सवलत देण्यात आली आहे. तर 75 वर्षांच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत असणार आहे. आता या गाडीच्या तिकिटा बद्दल बोलायचं झालं तर याचं पूर्ण तिकीट 565 रुपये आहेत तर अर्धा तिकीट 295 रुपये आहे.