Mumbai Railway | मुंबईहून या शहरासाठी सुरु झाली खास एक्सप्रेस ट्रेन; असे असेल वेळापत्रक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Railway | मुंबई म्हटलं की सगळ्यात आधी लोकांना आठवते, ते खूप जास्त गर्दी भरलेल्या लोकल ट्रेन, वाहनांची झालेली तुंबड. परंतु आता अशातच मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची अशी बातमी समोर आलेली आहे. कारण आता मुंबईहून (Mumbai Railway) एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये अनेक लोक दुसरीकडून येऊन स्थलांतर करत असतात. आणि तिथेच नोकरी वगैरे करत असतात. परंतु सणासुदीच्या काळात हे लोक त्यांच्या गावी जात असतात आणि त्यामुळे रेल्वेने प्रवास करताना खूप गर्दी होते. त्यामुळे दरवर्षी सणासुदीच्या काळामध्ये रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वेची संख्या देखील वाढवली जाते. यावर्षी देखील तेच करण्यात आलेले.

गणपती आणि पुढील तोंडावर येणाऱ्या सण लक्षात घेता, आता मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आज सुट्टी असल्यामुळे अनेक लोक हे यावर्षी आयोध्येला भेट देत आहेत. त्यामुळे आता मुंबईहून (Mumbai Railway) श्रीरामाच्या हा दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या देखील अधिक आहे. म्हणून मुंबई ते आयोध्या दरम्यान एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय मध्ये रेल्वेने घेतलेला आहे. डिसेंबरमध्ये श्रीराम प्रभूच्या मंदिराचे उद्घाटन झाले. त्यानंतर अनेक लोक हे आयुध्येला सतत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. परंतु ट्रेनची संख्या कमी पडल्याने या ठिकाणी खूप गर्दी होत असते. म्हणूनच या विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. आता या ट्रेनचे वेळापत्रक आपण जाणून घेणार आहोत.

वेळापत्रक | Mumbai Railway

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आयोध्या विशेष गाडी क्रमांक 01019 ही विशेष गाडी रविवारी सोडण्यात येणार आहे म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी ही गाडी सीएसटी मुंबई येथून 11: 20 मिनिटांनी सोडली जाणार आहे तरीही गाडी तिसऱ्या दिवशी आयोध्या या रेल्वे स्थानकावर सकाळी 9 : 30 वाजता पोहोचणार आहे.

त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 01020 ही आयोध्या सीएसएमटी गाडी 31 ऑगस्ट रोजी आयोध्या छाननी येथून रात्री ते 11 : 40 मिनिटांनी सोडली जाणार आहे. तर ती छञपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 8 : 15 वाजता पोहोचणार आहे. यातून विशेष ट्रेन मुंबईकरांसाठी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये आयोध्येला श्रीरामाच्या दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तुम्ही आता कोणत्याही टेन्शन शिवाय जाऊ शकता. तसेच जाताना येताना गर्दी देखील होणार नाही.