Mumbai To Ayodhya Flight । सध्या अयोध्या येथील राम मंदिराच्या उदघाटनाची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. येत्या 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उदघाटन होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात राम भक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यापूर्वी 30 डिसेम्बरला अयोध्या येथील श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकापर्ण नरेंद्र मोदी करणार आहेत. आता अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्यानंतर मुंबईहून अयोध्येला विमानसेवा कधी सुरु होणार असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच पडला असेल. चला तर आज आम्ही याबाबत तुम्हाला माहिती देणार आहोत.
प्रसिद्ध विमान कंपनी इंडिगोने यापूर्वी दिल्ली ते अयोध्येसाठी उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता कंपनीने अयोध्या ते मुंबई अशी विमानसेवा (Mumbai To Ayodhya Flight) सुद्धा सुरु करण्याची मोठी घोषणा केली आहे. इंडिगोचे अधिकारी विनय मल्होत्रा यानी याबद्दल माहिती दिली. ही विमानसेवा 15 जानेवारीपासून सुरु करण्यात येणार आहे. या विमानसेवेमुळे मुंबईहुन अयोध्येला जाणाऱ्या राम भक्तांची सोय होणार आहे. तसेच अयोध्येला जाण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागणार नाही. अयोध्या मुंबई विमानसेवेमुळे अयोध्या येथील पर्यटन, व्यवसाय आणि व्यापाराला चालना मिळेल असेही त्यांनी म्हंटल.
कस असेल मुंबई- अयोध्या विमानाचे वेळापत्रक – Mumbai To Ayodhya Flight
इंडिगोने शेअर केलेल्या वेळापत्रकानुसार, मुंबईहून अयोध्येला जाणारे विमान दुपारी 12:30 वाजता मुंबई येथून सुटेल आणि आणि 2:45 वाजता अयोध्येला पोहोचेल, तर अयोध्येहून विमान दुपारी 3:15 वाजता निघून मुंबईला 5:40 वाजता पोहोचेल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. इंडिगो पूर्वी एअर इंडियाची (Air India) सहकारी एअरलाइन इंडिया एक्सप्रेसने देखील दिल्ली ते अयोध्या या मार्गावर ३० डिसेंबर रोजी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती.