Mumbai To Dubai Train : मुंबई ते दुबई 2 तासांत गाठणार; समुद्राखालून जाणार ट्रेन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत आणि युनाइटेड अरब अमिराती ( UAE ) यांचे परस्पर संबंध खूप मजबूत आहेत. भारतातील अनेक लोक युनाइटेड अरब अमिराती (UAE ) मध्ये व्यवसाय, नोकरी व पर्यटनासाठी  जातात. भविष्यात भारत आणि युनाइटेड अरब अमिराती (UAE) चा व्यापार देखील अजून मोठ्या प्रमाणात वाढणार  आहे. याचाच विचार करून भारत आणि युनाइटेड अरब अमिराती (UAE) दरम्यान समुद्रातून जाणारी रेल्वे (Mumbai To Dubai Train) बांधण्याचा विचार आहे. यामुळे मुंबई ते दुबई अंतर अवघ्या 2 तासांत पार करू शकणार आहात.

2000 KM रेल्वे नेटवर्क – (Mumbai To Dubai Train)

भारतातील मुंबई ते युनाइटेड अरब अमिराती (UAE ) मधील दुबई दरम्यान हे रेल्वे नेटवर्क उभारले जाईल. दोन्ही शहरांच्या दरम्यान बनवल्या जाणाऱ्या रेल्वे मार्गामुळे दोन्ही देशात सहजरित्या व जलद गतीने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. भविष्यात भारतातील प्रवाशी मुंबईहुन दुबईला अवघ्या 2 तासात पोचतील. या प्रकल्पाला पूर्ण मान्यता मिळाली तर दुबईला मुंबईशी जोडण्यासाठी 2000 किलोमीटरपर्यंतचे रेल्वे नेटवर्क तयार करण्यात येईल.

UAE-इंडिया कॉन्क्लेव्ह दरम्यान प्रकल्पाबद्दल माहिती: 

हा संपूर्ण प्रस्ताव युनाइटेड अरब अमिराती (UAE) या देशाने दिलेला असून यावर युनाइटेड अरब अमिराती (UAE) मधील नॅशनल अँडव्हायझर ब्यूरो लिमिटेड काम करणार आहे. नॅशनल अॅडव्हायझरी ब्युरो लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य सल्लागार अब्दुल्ला अलसेही यांनी UAE-इंडिया कॉन्क्लेव्ह दरम्यान या अंडरवॉटर ट्रेन प्रकल्पाबद्दल (Mumbai To Dubai Train) माहिती दिली आहे. दोन्ही देशातील कच्चा तेलाचा व इतर परस्पर व्यापार वृद्धी यातून होईल असे कंपनीचे म्हणणे  आहे त्यासाठीच हे रेल्वे नेटवर्क महत्वाचे ठरणार आहे.

जपान व चीन मध्ये तंत्रज्ञान उपलब्ध :

सध्याच्या घडीला अनेक देशात समुद्रातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाची बांधणी केलेली आहे. या तंत्रज्ञानात जपान हा देश आघाडीवरअसून जपानमध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे नेटवर्क उभारण्यासाठी यांचा वापर झाला आहे. यामध्ये चीन देखील मागे नसून त्यांनीही हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. अमेरिका,ऑस्ट्रेलिया आणि रशियादेखील समद्रातून रेल्वे उभारण्याचा विचार करत आहेत.