Mumbai To Jalna Vande Bharat : मुंबई- जालना वंदे भारत एक्सप्रेस ‘या’ दिवशी राहणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai To Jalna Vande Bharat। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी 6 वंदे भारत एक्सप्रेस व 2 अमृत भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी मुंबई ते जालना या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या गाडीमुळे जालना, छत्रपती संभाजीनगर सहित मराठवाड्यातील नागरिकांना आता लवकर मुंबईमध्ये आपल्या कामासाठी पोहोचणे शक्य झाले आहे. मुंबईमधील पर्यटकांना मराठवाड्यातील पर्यटन स्थळांना भेटी देणे यामुळे शक्य होणार आहे. पूर्वी हा प्रवास आत्ताच्या तुलनेत खूप मंद गतीने होता. आता मुंबईला जाण्यास किंवा मुंबईहून जालनाला येण्यासाठी कमी वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जालन्याला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला (Mumbai To Jalna Vande Bharat) प्रवाश्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवल्याचे दिसत आहे. दक्षिण – मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, 2 जानेवारी 2024 रोजी मराठवाड्यातील जालन्याहून निघालेल्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाश्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. सदर एक्सप्रेसमधील 530 सीट फुल झाल्या होत्या होत्या. ही क्षमता 100 टक्के मानली जाते. विशेष म्हणजे संभाजीनगर येथील जास्त रेल्वे प्रवाश्यांनी या ट्रेनमधून प्रवास केला असल्याचे दिसून आले आहे. 2 जानेवारी 2024 रोजी सहा वाजण्याच्या वेळी वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन जालना रेल्वे स्थानकावरून निघाली होती. जालना नंतर या ट्रेनचा पुढील थांबा संभाजीनगर असा होता. या दरम्यान प्रवाशी जास्त संख्येने होते. संभाजीनगरहून ही ट्रेन पुढे मुंबईला कूच झाली. वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन प्रथमच जालना ते मुंबई असा प्रवास करणार असल्याने या ट्रेनमध्ये कोणत्या सुविधा आहेत, गाडीचे डिझाईन नेमके कसे आहे यांबाबत प्रवाश्यांमध्ये मोठी उत्सुकता होती.

मुंबई – जालना वंदे भारत ट्रेन बुधवारी बंद राहणार – (Mumbai To Jalna Vande Bharat)

वंदे भारत एक्सप्रेस ही हायस्पीड ट्रेन ताशी 130 किमी धावते. दक्षिण – मध्य रेल्वेच्या वेळापत्रकानुसार ती आठवड्यातून सहा दिवस या लोहमार्गावर सुरु राहणार आहे. म्हणजे ही ट्रेन सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे सहा दिवस या मार्गावर निश्चित कालावधीत प्रवास करणार आहे. फक्त बुधवारी ही ट्रेन (Mumbai To Jalna Vande Bharat) सदर मार्गावर धावणार नाही, बंद राहील. वंदे भारत एक्सप्रेसला एवढा मोठा प्रतिसाद आहे की, 4 जानेवारी पर्यंत या ट्रेनला वेटिंग लिस्ट आहे. म्हणजेच या ट्रेनचे 4 डिसेंबरपर्यंतचे बुकिंग हाउसफुल झाले आहे. ही ट्रेन फक्त बुधवारी जालना ते मुंबई लोहमार्गावर बंद रहाणार आहे.