Mumbai To Konkan : मुंबईकर चाकरमान्यांना गणपतीसाठी खास गिफ्ट ! जलमार्गाने आता कोकण फक्त 4 तासांवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai To Konkan : मुंबईहून कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून, आता मुंबईहून कोकणात जाणे अत्यंत सोपे आणि झपाट्याने शक्य होणार आहे. या नव्या योजनेनुसार, मुंबईतील माझगाव डॉकपासून मालवण, विजयदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत थेट जलवाहतूक सेवा (Mumbai To Konkan) सुरु होणार आहे.

जलमार्गाने कोकण प्रवास (Mumbai To Konkan)

या नव्या जलमार्ग सेवेमुळे केवळ साडेचार तासांत मालवण आणि विजयदुर्ग, तर अवघ्या तीन तासांत रत्नागिरी गाठता येणार आहे. चाकरमान्यांना रस्त्यावरील वाहतूक कोंडी, खड्डे, आणि वेळखाऊ प्रवासापासून मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात प्रवास करण्यासाठी ‘एम टू एम’ नावाची अत्याधुनिक बोट वापरण्यात येणार आहे, ज्यामध्ये सर्व सुविधा आणि सुरक्षितता यांचा समावेश असेल.

जलवाहतूक प्रायोगिक तत्त्वावर

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे ही योजना प्रत्यक्षात येत आहे. ‘एम टू एम’ बोट २५ मे रोजी मुंबईच्या भाऊचा धक्का येथे दाखल होणार असून, त्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर सेवा सुरू होणार आहे. भविष्यात दर परवडणारे ठेवण्याचा सरकारचा मानस आहे, जेणेकरून सर्वसामान्य चाकरमानी सहजपणे या सेवेचा लाभ घेऊ शकतील.

महाराष्ट्रात 2 महिने मासेमारी बंद; मत्यव्यवसाय विभागाचे आदेश

कोकणातील गणपती दर्शन आता सहज शक्य

दरवर्षी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा मोठा वरदान ठरेल. रस्त्यांवरील अडथळे टाळून, समुद्रमार्गे गावी पोहोचणं आता एक आरामदायक अनुभव ठरणार आहे. ही जलवाहतूक सेवा केवळ प्रवास सुलभ करणार नाही, तर कोकणातील पर्यटनालाही चालना देईल. मुंबई ते कोकण प्रवासाची नवी वाट खुली झाली आहे. आता चाकरमानी आणि पर्यटक दोघांसाठीही एक जलद, सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.