9 एप्रिल पासून सुरू होणार, मुंबई ते नांदेड विशेष एक्सप्रेस ट्रेन ; 12 स्थानकांवर घेणार थांबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षात घेत, मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई ते नांदेड दरम्यान एक विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष ट्रेनची सेवा 9 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे आणि 25 जून 2025 पर्यंत चालवली जाईल. या गाडीमुळे मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, लोणावळा, नांदेड आणि इतर शहरांतील प्रवाशांना आरामदायक आणि वेगवान प्रवास अनुभवता येईल.

ट्रेनचे वेळापत्रक

मुंबई ते नांदेड विशेष एक्सप्रेस ट्रेन (ट्रेन क्रमांक 01105) प्रत्येक बुधवारी 00.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि नांदेडला त्याच दिवशी 19.00 वाजता पोहोचेल.
नांदेड ते मुंबई विशेष एक्सप्रेस ट्रेन (ट्रेन क्रमांक 01106) 9 एप्रिल ते 25 जून दरम्यान प्रत्येक बुधवारी 20.00 वाजता नांदेड येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 14.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.

१२ स्थानकांवर घेणार थांबा

ही विशेष गाडी मार्गावरील बारा महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे, जे प्रवाशांसाठी दिलासा देणारे ठरतील. गाडी थांबणार असलेली स्थानके आहेत: ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी, आणि पूर्णा.

या गाडीच्या सेवेमुळे मुंबई आणि मराठवाड्यातील प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होईल. विशेषतः उन्हाळी हंगामात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत, या ट्रेनने प्रवास अधिक आरामदायक आणि सुकर बनवण्याची आशा आहे.