Mumbai Trans-Harbour Sea Link लवकरच होणार खुला; आता 20 मिनिटात गाठा नवी मुंबई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील सर्वात मोठा सागरीपूल असणारा  मुंबई ट्रान्स-हर्बर लिंक प्रोजेक्ट (Mumbai Trans-Harbour Sea Link) मुंबईकरांसाठी यावर्षाखेर सुरु करण्यासाठी शासनाकडून पाऊले टाकली जात आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA ) मुंबई ट्रान्स- हर्बर लिंक प्रकल्पाचे संचालन आणि देखभालीसाठी अनुभवी कंपन्यांकडून जागतिक निविदा आमंत्रित केल्या आहेत. त्यानुसार हा मार्ग सुरु करण्यासाठीचा महत्वाचा टप्पा पुर्ण केला जाणार आहे.

मुंबई ट्रान्स-हर्बर लिंक प्रोजेक्ट म्हणजेच ” अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू ” हा एकूण 21.8 km लांबीचा  सागरीसेतू असून सध्याच्या  घडीला हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे. जो की दक्षिण मुंबईला समुद्रमार्गे नवी मुंबईशी जोडेल. हा सी- लिंक प्रकल्प शिवडी येथील मेसंट रोडपासून सुरू होतो जिथे तो ईस्टर्न फ्रीवेला जोडलेला आहे आणि नवी मुंबईतील शिवाजी नगर येथे मुख्य भूभागावर संपतो.पुढे हा मार्ग राज्य महामार्ग क्रमांक 54 लाही जोडला जाणार आहे.

फक्त 20 मिनिटात पोचाल नवी मुंबईत –

या सागरीपुलाचा वापर करून दक्षिण मुंबई मधून फक्त 20 मिनिटात मुंबईकर नवी मुंबई शहरात  येऊ शकता. मुंबई ट्रान्सहर्बर लिंकच्या माध्यमातून उत्तर मुंबई मधील ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मुंबई ट्रान्स- हार्बर लिंकवर ओपन टोलिंग सिस्टम असल्यामुळे वाहनांना सागरी पुलावर सतत टोल भरण्यासाठी थांबावं लागणार नाही. त्यामुळे सी -लिंक वर वाहतूक कोंडी होणार नाही. सध्या ही टोलिंग सिस्टम सिंगापूरमध्ये वापरली जात आहे.

राज्य सरकारसाठी  मुंबई ट्रान्सहर्बर लिंक प्रोजेक्ट सर्वात महत्वाकांशी प्रोजेक्ट असून या प्रोजेक्ट मुळे मुंबई मेट्रोपोलिटन भागात मोठ्या प्रमाणात विकासाला गती  मिळेल. नवी  मुंबईच्या दक्षिण भागात  मोठ्या प्रमाणात अर्थकरणाला गती  मिळून मुंबई क्षेत्राच्या एवढ्या जवळ असून सुद्धा या भागाचा रखडलेला विकासाला देखील वेग मिळणार आहे.