मुंबई | अमित येवले
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव आता ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून या विमानतळाच्या नावामध्ये ‘महाराज’ हा शब्द टाकावा म्हणून मागणी होत होती.
आधीचे नाव हे महाराजांच्या नावात एकेरीपणा दर्शवित असल्याने महाराष्ट्रामधील अनेक संघटना ह्या संबधीत नावात ‘महाराज’ हा शब्द टाकावा म्हणून मागणी करीत होते. आजपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ या नावाने पूर्णपणे कामकाज आणि व्यवहार केले जातील. या निर्णयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाणिज्य व औद्योगिक मंत्री सुरेश प्रभू यांचे अभिनंदन केले आहे.