‘तारक मेहता’ फेम अभिनेत्री मुनमुन दत्ताचा अपघात; गंभीर दुखापत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ताचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मुनमुन काही दिवसांपासून परदेशात ट्रीपला गेली. ती जर्मनीमध्ये असताना मुनमुनचा अपघात झाला असून तिने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.

मुनमुनने इंस्टावरुन एक स्टोरी शेयर केली आहे. जर्मनीमध्ये माझा छोटासा अपघात झाला आहे. माझ्या डाव्या गुडघ्याला खूप दुखापत झाली आहे. त्यामुळे मला जर्मनी ट्रीप अर्धवट सोडून मायदेशी परतावं लागलं. परंतु चाहत्यांनी काळजी करु नका असं आवाहन करत आपण सुखरुप असल्याचे तिने सांगितले.

मुनमुन दोन दिवसांपूर्वी स्वित्झर्लंडमधील इंटरलेकन ट्रेननं जर्मनीला आली होती. त्यावेळचे काही फोटो देखील तिनं सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये मुनमुन दत्ता खूप खुश दिसत होती. परंतु दुर्दैवाने तिचा अपघात झाला आणि आपला तिला प्रवास अर्धवट सोडून घरी परतावे लागले आहे. तिच्या अपघाताने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.