“प्रायव्हेट पार्ट” कापून तरुणाची निर्घृण हत्या; 3 दिवसांवर लग्न आलं होतं, पण तत्पूर्वीच….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या 3 दिवसांवर लग्न आलेलं असतानाच एका तरुणाची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना उत्तरप्रदेशातील कानपूर येथे घडली आहे. विकृतीचा कळस म्हणजे या मृत मुलाचा प्रायव्हेट पार्टही कापण्यात आला आहे. बुधवारी या तरुणाचा हळदी समारंभ होता. लग्नासाठी हळद लावल्यानंतर तो घराबाहेर पडला असता गुरुवारी सकाळी शेतात त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमेच्या खुणाही दिसल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील काही ग्रामस्थांना नान नदीच्या काठावर एका तरुणाचा मृतदेह शेतात पडलेला दिसला. यानंतर गावकऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. घटनेचं गांभीर्य पाहून एसीपी दिनेश शुक्ला यांनी स्वत: घटनास्थळी पोहोचून आढावा घेतला. पोलिसांनी घटनास्थळावरून एक चाकूही जप्त केला आहे. त्या चाकूनेंच सदर युवकाचा खून करण्यात आला असून त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ही हत्या प्रेमप्रकरणातून करण्यात आल्याची चर्चा आहे.

सदर मृत व्यक्तीचे नाव परमेंद्र कुमार असे असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या 11 जून रोजी त्याचे लग्न होणार होते. त्यामुळे घरात लग्नाची तयारीही जोरात सुरु होती अशातच त्याचा खून करण्यात आल्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परमेंद्र कुमार याचा खून का करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पोलीस याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. आत्तापर्यंत याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत आहेत.