लादेनचं फंडिंग, कसाबचं ट्रेनिंग; दहशतवाद्यांचा कारखाना उध्वस्त

muridake air strike
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्याचा बदला घेत रात्री 1.30 वाजता पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले आहेत. भारताने बहावलपूर, मुरीदके, सवाई, गुलपूर, बिलाल, कोटली, बारनाला, सरजाल आणि महमूना याठिकाणी हल्ले केले. महत्वाची गोष्ट म्हणजे मुरीदके मध्ये जे, ओसामा बिन लादेनने १ कोटी रुपये देऊन बांधलेले दहशतवादी केंद्र, जिथे मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब आणि इतरांना प्रशिक्षण देण्यात आले होते ते दहशतवादी केंद्र भारताने उद्ववस्त केले आहे. यामुळे भारताने फक्त पहलगामच नव्हे तर मुंबईवरील २६/ ११ हल्ल्याचा सुद्धा बदला घेतलाय.

मुरीदके येथे, लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय आहे, ज्याला मरकज-ए-तैयबा असेही म्हणतात. हे लाहोरजवळील जीटी रोडच्या पूर्वेकडील नांगल सदय येथे आहे, मुरीदकेपासून सुमारे ५ किमी उत्तरेस. हे कॅम्प लष्कर-ए-तैयबाने १९८८ मध्ये स्थापन केले होते. हे २०० एकरवर पसरलेले क्षेत्र आहे, ज्यामध्ये एक मदरसा, रुग्णालय, बाजार, निवासस्थान, एक मत्स्यपालन आणि कृषी क्षेत्र समाविष्ट आहे, जे दहशतवादी वापरतात. या संपूर्ण गटाचे नेतृत्व दहशतवादी हाफिज मुहम्मद सईद करतो. या संपूर्ण परिसराला तळाला दहशतवादाचा कारखाना म्हटले जाते. ओसामा बिन लादेनने मरकझ तैयबा संकुलात बांधकामासाठी एक कोटी दिले होते. याच दहशतवादी केंद्रांत नापाक कट रचले जात होते.

मुरीदके येथे मुख्यालय स्थापन करण्यामागील लष्कर-ए-तैयबाचा उद्देश दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणे आणि भारतात दहशतवादी हल्ले करणे तसेच काश्मीर प्रश्न भारतापासून वेगळा करणे आहे. मुरीदके येथे दरवर्षी सुमारे १००० तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते. या केंद्रात मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब यालाही ट्रेनिंग देण्यात आलं होतं. अखेर भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या लपण्याच्या याच ठिकाणांवर हल्ला केला आहे. एकप्रकारे दहशतवादाला गाडण्याचे हे सर्वात मोठं पाऊल मानले जात आहे.

मसूद अझहरचे सर्व कुटुंब ठार –

दरम्यान, भारतीय हवाई दलाने सीमेपासून १०० किमी अंतरावर असलेल्या बहबलपूरमधील मसूद अझहरच्या घरावर सुद्धा पहाटे १.३० वाजता हल्ला केला. या हल्ल्यात कुटुंबातील १४ दहशतवादी मारले गेले. मसूद अझहरचे संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत असतानाच परिसरात बॉम्ब टाकण्यात आले, त्यात कुटुंबातील १४ जण मारले गेले. परंतु मसूद अझहर घरी उपस्थित नव्हता. भारताच्या एअर स्ट्राइकच्या वेळी मसूद अझहरची (Masood Azhar) मोठी बहीण, मौलाना कशफचे संपूर्ण कुटुंब, मुफ्ती अब्दुल रौफ यांचे नातू, मोठी मुलगी शहीद बाजी सादिया हे तिच्या पती आणि चार मुलांसह घरात झोपले होते. त्याचवेळी भारताने हल्ला केला. या हल्ल्यानंतर मी पण मेलो असतो तर बरं झालं असत अशी प्रतिक्रिया मसूद अझहरने दिली आहे.