राज ठाकरे मुर्दाबाद!! मुंबईत मुरजी पटेल समर्थकांची घोषणाबाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडुकीतून भाजपने माघार घेतली आहे. भाजपचे आजच्या शेवटच्या दिवशी आपले अधिकृत उमेवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेण्याची घोषणा केल्यांनतर मुंबई पटेल यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

राज ठाकरेंमुळेच भाजपने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. भाजप जर दुसऱ्या पक्षाचे ऐकणार असेल तर आम्ही त्यांचे समर्थन करणार नाही . असं एक समर्थकाने म्हंटल. तर मुरजी पटेल यांनी फॉर्म भरायच्या आधीच भाजपने विचार करायला हवा होता. राज ठाकरेंच्या पत्रानंतर निर्णय घेणं पूर्णपणे चुकीचं आहे. राज ठाकरेंच्या दबावामुळेच मुरजी पटेल यांचा अर्ज भाजपने मागे घेतला असा थेट आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला.

राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस याना पत्र पाठवत अंधेरी पोटनिवडणूक भाजपने लढवू नये अशी विनंती केली. राज यांच्या या पत्रांनंतरच राजकीय घडामोडींना वेग आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज ठाकरेंची री ओढत ऋतूजा लटके याना बिनविरोध निवडून द्यावे असं म्हंटल. त्यांनतर आज भाजपची बैठक पार पडली. यांनतर भाजपने या निवडणुकीतून आपण माघार घेत असल्याचे जाहीर केलं .