Mushroom Farming | बँकेची नोकरी सोडून पठ्ठ्याने केली मशरूमची शेती, महिन्याला करतोय ‘एवढी’ कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mushroom Farming | आजकाल शेतीकडे तरुण व्यावसायिक दृष्टीने बघतात. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आजकाल तरुण देखील या शेतीमध्ये काम करताना दिसतात. ही आपल्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की, तरुण प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून खूप चांगली शेती करत आहेत. अनेकजण तर असे आहेत जे त्यांची चांगली नोकरी सोडून शेती करतात. त्या शेतीतून ते नोकरी पेक्षाही कितीतरी पटीने जास्त उत्पन्न घेतात. आज देखील आपण अशीच एक कहानी जाणून घेणार आहोत, ज्या तरुणाने त्याची चांगली नोकरी सोडून दिली आणि त्याने शेतीचा व्यवसाय चालू केला.

आजकाल मशरूमला (Mushroom Farming) सर्वत्र मागणी वाढत आहे. मशरूमचा वापर अनेक गोष्टींमध्ये केला जातो. त्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात केले जाते. या मशरूममध्ये कमी खर्चात खूप चांगली कमाई होऊ शकते. यासाठी जास्त मेहनत लागत नाही. त्याचप्रमाणे अगदी कमी वेळात चांगले उत्पन्न होते. असाच प्रयोग एका तरुणाने केला आहे आणि त्याला चांगले यश मिळालेले आहे.

देवाशीष नावाचा एक तरुण आहे. तो झारखंडमधील जमशेदपूर येथील रहिवासी आहे. त्याला बँकेची नोकरी होती या बँकेच्या नोकरीमध्ये तो खुश होता. परंतु अचानक त्याला मशरूमच्या शेतीची माहिती मिळाली आणि त्याने मशरूमची शेती करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याला ही शेती करताना त्याच्या संपूर्ण लक्ष शेतीमध्ये टाकायचे होते. त्यामुळे त्यांनी बँकेची नोकरी सोडून स्वतःचे काम सुरू करायचे ठरवले. त्याने मशरूमची शेती करायला सुरुवात केली. या मशरूमच्या शेतीमध्ये तो दिवसाला फक्त तीन ते चार तास काम करतो. त्याला सध्या महिन्याला 25 ते 30 हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते.

माध्यमांशी बोलताना देवाशिष याने सांगितले की, सफेद मशरूम आणि ऑईस्टर मशरूम असे मशरूमचे दोन प्रकार असतात. या दोन्ही प्रकारची शेती सध्या भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते. देवाशीष ऑईस्टर मशरूमची शेती करतो. त्याने त्याच्या घरातच या मशरूमच्या शेतीसाठी 500 स्क्वेअर फुटाची जागा निर्माण केली आहे. प्लास्टिकच्या बागेत त्याने ही शेती निर्माण केलेली आहे. या मशरूमच्या शेतीला सकाळी आणि संध्याकाळी पाणी देणे खूप गरजेचे असते केवळ 25 दिवसातच हे मशरूम तयार होते आणि बाजारात विकायला जाऊ शकते.

मशरूमला (Mushroom Farming) लावलेली बॅग हे दोन महिन्यांसाठी परफेक्ट असते. या दोन महिन्यात जवळपास चार ते सहा वेळा मशरूम निघते. एका वेळी जवळपास एक किलो मशरूम निघते. हे मशरूम बाजारात विकतो बाजारात मशरूमला सध्या प्रति किलो 180 ते 200 रुपये एवढा भाव आहे. या सगळ्याची माहिती देवाशीष याने दिलेली आहे.

देवाशिषने नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याने अनेक लोकांनी त्याला हिणवले. परंतु त्याने त्याच्या जिद्दीने आणि कष्टाने या मशरूमच्या शेतीत यश मिळवून दाखवले. आणि आज तो अगदी कमी मेहनत करून महिन्याला चांगली कमाई करत आहे. त्याचप्रमाणे पुढे जाऊन या मशरूमच्या शेतीमध्ये तो मोठ्या प्रमाणात वाढ करणार असल्याचे देखील त्याने सांगितलेले आहे.