हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या ६ जुलैला आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2025) असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. आपल्या विठुरायाच्या (vitthal Darshan) दर्शनसाठीच वारकऱ्यांचा अलोट सागर दरवर्षी पंढरपुरात भरत असतो. यंदाही टाळ- मृदूंगाच्या गजरात विठुरायाच्या भक्तानी पंढरपूरकडे प्रस्थान केलं आहे. वारी म्हणजे हिंदू धर्मातील पवित्र सण असं म्हंटल जाते. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल कि पांडुरंगाच्या एका मुस्लिम भक्ताने तब्बल १ किलोचा चांदीचा मुकुट विठुरायाला अर्पण केल्याची बातमी समोर येत आहे. गनी सय्यद (Gani Sayyad) असं सदर मुस्लिम भक्ताचे नाव असून ते मूळचे लातूर जिल्ह्यातील आहेत. गनी सय्यद यांच्या या कृतीने महाराष्ट्रातील जातीय सलोख्याची आणखी एक हृदयस्पर्शी कहाणी समोर आली आहे.
कोण आहेत गनी सय्यद?
विठुरायाला १ किलो चांदीचा मुकुट अर्पण करणारे गनी सय्यद हे विठ्ठल मंदिराच्या ठिकाणी काम करत आहेत. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी लागणारे दगड गनी सय्यद फोडतात. यादरम्यान, मंदिरात जाणे येत होत असल्याने त्यांचे विठ्ठलाशी असलेले आध्यात्मिक नाते अधिक घट्ट झाले. याच भक्तीतून गनी सय्यद यांनी १ किलो चांदीचा मुकुट विठुरायाला अर्पण केला. त्यांच्या या अनोख्या भक्तीचे सर्वच स्तरावर कौतुक केलं जात आहे. तसेच महाराष्ट्रातील जातीय सलोख्याची आणखी एक हृदयस्पर्शी कहाणी समोर आली आहे. विठ्ठल मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी गनी सय्यद यांचे स्वागत केले आणि त्यांच्या भक्तीचे कौतुक केले.
दरम्यान , येत्या ६ जुलैला आषाढी एकादशी आहे. यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी पंढरपूरला चालत जात आहेत. वारी म्हणजे फक्त चालणं नव्हे तर ती श्रद्धा, भक्ती आणि एकतेची एक वाहती नदी आहे, जी शतकानुशतके अतुलनीय उत्साहाने साजरी केली जाते. दरवर्षी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने वारकऱ्यांचे पाय पंढरीच्या दिशेने जात असतात. पंढरपूर वारी, ही भारतातील सर्वात प्रिय आणि प्राचीन धार्मिक तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. ज्यांना पायी जाणे शक्य नाही ते इतर वाहनांनी पंढरपूरला जातात. वारकऱ्यांना प्रवास सुखाचा आणि आनंदाचा व्हावा यासाठी राज्य सरकार सुद्धा प्रयत्नशील असते. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील प्रमुख शहरातून पंढरपूर साठी विशेष बस, ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.




