मुस्लिम मतदारांची साथ कोणाला? Exit Poll मध्ये धक्कादायक खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) सर्वच्या सर्व ७ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून उद्याच्या ४ जूनला लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे. देशाची सत्ता कोणाच्या हातात जाणार हे उद्या स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी अनेक वृत्तवाहिन्यांनी वेगवेगळ्या Exit Poll च्या माध्यमातून अंदाज वर्तवला आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये NDA ची सत्ता पुन्हा एकदा येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, एक्झिट पोलनुसार देशातील मुस्लिम मतदाराने (Muslim Voter) कोणाला साथ दिली याचीही आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार यंदा मुस्लिम मतदारांनी भाजपला नाकारत इंडिया आघाडीला भरगोस मत दिल्याचे दिसत आहे.

रिपब्लिक टीव्हीच्या पीमार्क सर्वेक्षणानुसार, 72 टक्के मुस्लिम मतदार काँग्रेसला मतदान करताना दिसतात. याचाच अर्थ काँग्रेसला प्रत्येक 4 पैकी 3 मुस्लिम मतदारांची पहिली पसंती आहे. 2019 मध्ये हेच प्रमाण 52 टक्के होतं, मात्र यंदा 72 टक्के मुस्लिम मतदार इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) पाठीशी उभा राहिला आहे. तर भाजपला मात्र मुस्लिम मतदारांनी ठेंगा दाखवल्याचे दिसत आहे. इंडिया टुडे ॲक्सिस माय इंडियानुसार यंदाच्या लोकसभा निडवणुकीत भाजपला 6 टक्के मुस्लिम मते मिळू शकतात. 2019 मध्ये हेच प्रमाण ९ टक्के होते. म्हणजे भाजपच्या मुस्लिम मतांत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार यावेळी इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशात 38 टक्के जास्त मुस्लिम मत मिळतील. यात बहुजन समाजवादी पार्टीचे 34 टक्के मुस्लिम वोट इंडिया आघाडीकडे वळण्याची शक्यता आहे. हीच गोष्ट बिहारमध्येही पाहायला मिळेल. बिहारमध्ये इंडिया आघाडीला मागील निवडणुकीपेक्षा 16 टक्के मुस्लिम मत जास्ती मिळण्याचा अंदाज आहे . तर दुसरीकडे भाजपला ५९ टक्के ओबीसी मते मिळू शकतात असा अंदाज रिपब्लिक टीव्हीच्या पीमार्क सर्वेक्षणानुसार दिसत आहे. देशातील महिलांचाही भाजपवर विश्वास असल्याचे या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. भाजपला देशभरात 40 टक्के मते मिळू शकतात असा मोठा दावा करण्यात आला आहे.