हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुंतवणुकीच्या दृष्टीने आघाडीवर असलेल्या म्युच्युअल फंडाबद्दल एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक नोव्हेंबरमध्ये तब्बल 75 टक्क्यांनी घटली आहे. यामुळे सातत्याने वाढणाऱ्या चढता आलेखाची नोंद असलेल्या म्युच्युअल फंडांमध्ये एक मोठा बदल दिसून आला आहे. यासोबत इक्विटी म्युच्युअल फंडांमध्येही 14 टक्क्यांची घट झाली असून, एसआयपीमध्ये देखील मोठी घसरण नोंदवली गेली आहे.
गुंतवणुकीवर मोठा परिणाम –
जागतिक भू-राजकीय घटनांचा, अमेरिकेतील निवडणूक निकालांमुळे वाढलेली अस्थिरता तसेच इतर आर्थिक घटक यांमुळे गुंतवणुकीवर मोठा परिणाम झाला आहे. नोव्हेंबरमध्ये म्युच्युअल फंडांमध्ये केवळ 60363 कोटी रुपये गुंतवले गेले, तर ऑक्टोबरमध्ये हा आकडा 2.39 लाख कोटी रुपये होता. इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये नोव्हेंबरमध्ये 35943 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, ज्यात 14 टक्क्यांची घट नोंदवली गेली. सेक्टोरल आणि थीमॅटिक फंड या विभागात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, पण लार्ज कॅप फंडांमध्ये गुंतवणुकीचा ओघ कमी झाला आहे.
SIP मधेही घट –
SIP मधून नोव्हेंबरमध्ये 25320 कोटी रुपये गुंतवले गेले, ज्यात ऑक्टोबरच्या 25322 कोटी रुपयांच्या तुलनेत दोन्ही महिन्यांमध्ये खूप कमी फरक आहे. पण यामध्ये घट दिसून येत आहे. एसआयपी खात्यांची संख्या 10.22 कोटींवर पोहोचली आहे. तसेच डेट फंडांमध्ये 92 टक्क्यांनी घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये या फंडांमध्ये 1.57 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होती, पण नोव्हेंबरमध्ये फक्त 12915 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.