व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Mutual Funds : 15% पेक्षा जास्त रिटर्न देणाऱ्या ‘या’ Scheme पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भविष्याच्या आर्थिक दृष्टिकोनातून आपण विविध FUNDS मध्ये गुंतवणूक करत असतो ज्यात शेअर बाजार,FD ह्या प्रमाणे आपण म्युच्युअल फंडमध्येही गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून पाहत असतो जिथे जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास आपल्याला म्युच्युअल फंड 15% पेक्षा जास्त परतावा देऊ शकतो. आजच्या आपल्या ह्या लेखात जाणून घेऊयात अश्या 10 म्युच्युअल फंड योजना ज्या आपल्याला 15% हून अधिक परतावा मिळवून देऊ शकतात.

बँक आणि पतसंस्थेच्या तुलनेत म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला रिटर्न मिळतो. जर म्युच्युअल फंड योजना सलग 5 वर्ष दरवर्षी 15% पेक्षा जास्त ह्या प्रमाणे रिटर्न देत असतील तर त्या चांगल्या मानल्या जाऊ शकतात. येथे आम्ही अशा टॉप 10 म्युच्युअल फंड योजनां बद्दल तुम्हाला सांगणार आहोत, ज्या योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या 5 वर्षांत दरवर्षी सरासरी 15% पेक्षा जास्त रिटर्न मिळवून दिला आहे. आपण म्युच्युअल फंड योजनांमध्ये एकरकमी किंवा दर महिन्याच्या गुंतवणुकीच्या पद्धतीने म्हणजेच SIP द्वारे गुंतवणूक करू शकतो. म्युच्युअल फंडातील SIP ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील आरडी सारखीच असते. म्हणजे दर महिन्याला ठराविक रक्कमेची गुंतवणूक करत असतो आणि नंतर काही कालावधीनंतर आपल्याला मोठी रकम मिळते. SIP द्वारे गुंतवणूक केल्याने शेअर बाजारातील चढ-उतार जाणण्यास मदत होते. तसेच लहान गुंतवणूक करून तुम्ही मोठी रक्कम जमा करू शकता म्हणूनच शेअर बाजारातील तज्ञ्मंडळी नेहमीच म्युच्युअल फंडात दीर्घकाळासाठी SIP द्वारे गुंतवणूक करण्याची शिफारस करतात.

टॉप 10 म्युच्युअल फंड scheme –

क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड: 25.31 टक्के
क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड: 21.13 टक्के
क्वांट ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड: 20.95 टक्के
ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी म्युच्युअल फंड: 20.92 टक्के
क्वांट मिड कॅप म्युच्युअल फंड: 20.42 टक्के
आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया म्युच्युअल फंड: 20.17 टक्के
एक्सिस स्मॉल कॅप म्युच्युअल फंड: 19.99 टक्के
SBI तंत्रज्ञान संधी म्युच्युअल फंड: 19.98 टक्के
टाटा डिजिटल इंडिया म्युच्युअल फंड: 19.61 टक्के
क्वांट फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड: 19.09 टक्के
टीप: या म्युच्युअल फंड योजनांचा परतावा हा 10 मे 2023 रोजी NAV च्या आधारे मोजला गेला आहे.