MVA Offer To Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींना महाविकास आघाडीची सर्वात मोठी ऑफर; राजकारणात नवा ट्विस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MVA Offer To Sambhajiraje Chhatrapati : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाला उमेदवारी द्यायचे हे जवळपास निश्चित झालं आहे. याच दरम्यान, महाविकास आघाडीने कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे याना मोठी ऑफर दिली आहे. संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीतील कोणत्याही एका पक्षात प्रवेश केल्यास त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात येणार आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. ही बातमी खरी ठरली तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड आपल्याला पाहायला मिळेल.

संभाजीराजे कोल्हापुरातून लोकसभा लढवणार??- MVA Offer To Sambhajiraje Chhatrapati

संभाजीराजेंच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीमध्ये एकमत झालं आहे. शक्यतो ते कोल्हापूर मधूनच खासदारकीला उभे राहतील. कोल्हापुरात लोकसभेच्या २ जागा आहेत. त्यातील एक म्हणजे हातकणंगले आणि दुसरी म्हणजे कोल्हापूर…. सध्या कोल्हापूरचे दोन्ही खासदार धैर्यशिल माने आणि संजय मंडलिक हे शिंदे गटात आहेत. त्यामुळे महविकास आघाडीकडून या दोन्ही नेत्यांना हरवण्यासाठी खास रणनीती आखण्यात येत आहे. त्यासाठी हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली जाईल आणि कोल्हापूरच्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाचा विचार (MVA Offer To Sambhajiraje Chhatrapati) होऊ शकतो. यामुळे आता संभाजीराजे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यापूर्वी राज्यसभेचे खासदार होते. त्यानंतर त्यांनी स्वतःचा स्वराज्य पक्ष सुद्धा काढला. मधल्या काळात राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेने त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी पक्षाकडून घालण्यात आलेल्या काही अटी संभाजीराजेंना मान्य नव्हत्या. त्यानंतर शिवसेनेने त्यांच्या ऐवजी संजय पवार याना राज्यसभेच्या निवडणुकीत उतरवलं होते, मात्र त्यांच्या त्यावेळी पराभव झाला.