Myopia Cases | पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा होत्या. परंतु आता त्यामध्ये मोबाईलची देखील भर पडलेली दिसत आहे. कारण आजकाल अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेजण मोबाईल फोनचा वापर करतात. लहान मुलं रडू नये किंवा त्यांनी जेवावे म्हणून त्यांची आई त्यांना मोबाईल देते. त्यामुळे मुले तासान तास मोबाईल टीव्ही किंवा लॅपटॉप समोर बसलेली असतात. एक प्रकारचेनमुलांना व्यसनच लागलेले आहे.
परंतु या सगळ्यामुळे मुलांमध्ये मायोपिया (Myopia Cases ) या रोगाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. अलीकडे आलेल्या एका अहवालानुसार लहान मुलांमध्ये या मायोपियाचे प्रमाण 20 वर्षात 3 पटीने वाढलेले आहे. 2001 मध्ये केवळ दिल्लीत मायोपियाची 8 टक्के प्रकरण समोर आली होती. परंतु त्यानंतर स्मार्टफोनचा वापर वाढत गेला आणि 2011 मध्ये या केसेस 13.5 टक्के वाढल्या आणि 2021 मध्ये तब्बल 21% मुले ही मायोपियाचे बळी आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर या रोगाचे निदान वेळेवर केले नाही तर नंतर मुलांमध्ये अंधत्व येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे..
मायोपिया म्हणजे काय ? | Myopia Cases
मायोपिया (Myopia Cases ) हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये मुलं तासनतास स्क्रीनकडे बघत राहतात आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यांच्या बाहुलीचा आकार वाढत जातो. त्यामुळे त्यांना दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. मुलांना दूरदृष्टीचा त्रास होतो. विजन प्लस आय सेंटरच्या संचालक आणि नेत्र चिकित्सक डॉक्टर रेतू अरोरा यांनी सांगितलेले आहे की, “स्मार्टफोनचे आजकाल मुलांना व्यसन लागले आहे. त्यामुळे मुलांमध्ये मायोपियाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आमच्याकडे येणारे प्रत्येक चौथ्या मुलाला मायोपिया
मायोपियाकडे दुर्लक्ष करण्याचा धोका
डॉक्टर पुढे असे म्हणाले की, कोविड नंतर ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांचा डिजिटल स्क्रीनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अभ्यासाच्या नावाखाली मोबाईलवर गेम खेळतात. त्याचप्रमाणे व्हिडिओ देखील पाहत असतात. आणि या वयात पालक देखील मुलांना मोबाईल देतात. त्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर मोठा परिणाम झालेला आहे. जर त्यांना मायोपिया झाला तर त्यांच्या डोळ्याच्या पडद्याला छिद्र पडू शकतात आणि त्यांचा पडदा कमजोर होऊ शकतो. जर याचे उपचार वेळेवर केले नाही तर मुलांच्या डोळ्यांमध्ये काळे किंवा पांढरे मोतीबिंदू होऊ शकतो.
मायोपियाचा जास्त धोका कोणाला?
- जी मुलं छोट्या स्क्रीनवर जास्त वेळ घालवतात.
- स्मार्टफोन किंवा व्हिडिओ पाहून पाहणे गेम खेळणे यामुळे देखील माझ्या प्रियाचा धोका वाटतो.
- ज्या मुलांच्या पालकांना चष्मा आहे त्या मुलांना माझ्या त्रास होऊ शकतो.
मायोपीयाची लक्षणे काय आहे
- वाचताना किंवा लिहिताना खूप बारकाईने लक्ष द्यावे लागते.
- फळ्यावर लिहिलेले स्पष्टपणे दिसत नाही.
- मुलांना डोकेदुखी, खात सुटणे, डोळ्यातून पाणी येणे जळजळ होणे अशा तक्रारी येतात.
अशा प्रकारे स्वतःचे रक्षण करा
- तुमचा स्क्रीन टाईम कमी करा.
- लहान मुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवा.
- त्यांना दररोज एक किंवा दोन तास खेळायला पाठवा.
- लक्षणे दिसू लागतात त्यांना नेत्र तज्ञांकडे घेऊन जा.
- शिकवण्याची पद्धत बदला झोपताना किंवा वाकून त्यांना वसु देऊ नका.
- आहारात हिरव्या पालेभाज्या ,फळे त्याचप्रमाणे कोरड्या फळांचा देखील समावेश करा.
- सुरुवातीच्या काळातील मायोपिया डोळ्याच्या व्यायामाने बरा होऊ शकतो.