हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mysterious Places) संपूर्ण जग रहस्यांनी भरलेले आहे. अनेक ठिकाणी अनेक रहस्य दडली आहेत. ज्यांपैकी काहींचा शोध लागल्यानंतर त्यामागील रहस्य वैज्ञानिकांनी अगदी सहज शोधून काढली. पण काही गोष्टी अजूनही अशा आहेत ज्या समोर येऊनही त्यामागील गूढ उलगडण्यात वैज्ञानिकांन अपयशी ठरले आहेत. आजपर्यंत आपण अशा अनेक गोष्टींविषयी ऐकलं असेल. त्यामधील या ५ रहस्यमयी प्राचीन गोष्टींविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.
साकसेगेमन – एक पौराणिक मंदिर (Mysterious Places)
पेरू देशातील साकसेगेमन हे एक अत्यंत प्राचीन असे पौराणिक मंदिर आहे. या प्राचीन मंदिराच्या परिसरात अत्यंत भव्य आणि विशाल अशा मोठ- मोठ्या दगडांची भिंत दिसून येते. याबाबत खास सांगायचे म्हणजे, हे सर्व दगड एकमेकांशी जुळलेले दिसतात. होय. इथे उभे असलेले हे महाकाय दगड एकेमकांना चिकटलेले आहेत. आजपर्यंत कुणीच सांगू शकलेलं नाही की हे दगड असे चिकटलेले कसे आहेत? किंवा त्यांना जोडण्यासाठी कशाचा वापर केला होता? हजारो वर्षांपूर्वी हे दगड इतक्या बारकाईने कसे कोरले? याबाबत आजही कुणीच ठोस पुरावे देऊ शकलेलं नाही.
बोलवियातील ‘गेट ऑफ सन’
साऊथ आफ्रिकेतील बोलविया शहरात एक असं रहस्यमयी ठिकाण आहे ज्याला ‘गेट ऑफ सन’ म्हणून ओळखले जाते. हजारो वर्षांआधी उभ्या राहिलेल्या या शहरात एक दरवाजा आहे. ज्याला ‘गेट ऑफ सन’ म्हणतात. (Mysterious Places) वैज्ञानिकांनी या दरवाजावर संशोधन करताना असे सांगितले की, पूर्वीच्या काळी या दरवाज्याच्या मदतीने लोक ग्रहांच्या स्थितीचा अंदाज घेत असतील. पण याबाबत ठोस माहिती देता येणार नाही. अशाप्रकारे हा दरवाजा कोणी उभा केला? कशासाठी उभा केला? या दरवाजामूळे काय होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत.
योनागुनीचं डुबलेलं शहर
अनेक वर्षांपूर्वी जपानमध्ये एका व्यक्तीला विशाल समुद्रात एक भलं मोठं शहर आढळलं होतं. या शहराला ‘योनागुनीचं डुबलेलं शहर’ म्हणून ओळखलं जातं. असे सांगितले जाते की, हे शहर १० हजार वर्षांपूर्वी बुडालं होतं. वैज्ञानिकांनी या शहराबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. (Mysterious Places) मात्र या संशोधनात त्यांच्या हाती आलेल्या पुराव्यानुसार त्यांनी म्हटले, पाषाण युगानंतर मनुष्य जेव्हा पहिल्यांदा गुहेबाहेर निघाले तेव्हा त्यांनी याची निर्मिती केली असावी. वैज्ञानिकांनी केवळ असा अंदाज लावल्यामुळे या शहराबाबत पडलेले अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
कोस्टा रिकातील गुळगुळीत दगड
मध्य अमेरिकेतील कोस्टा रिका या शहरात गोल गोल आकाराचे अनेक गुळगुळीत दगड आहेत. हे दगड अनेक वर्षांपूर्वी १९३० मध्ये आढळल्याचे सांगितले जाते. या दगडांची खासियत म्हणजे, ते कुणी तयार केले? (Mysterious Places) का तयार केले? याबाबत कुणालाच ठाऊक नाही. मात्र पौराणिक कथांनुसार, या गोल दगडांमध्ये सोनं होतं असे सांगितले जाते. आता हे खरं, खोटं की निव्वळ अफवा? हे कुणालाच ठाऊक नाही.
इजिप्तमधील विशाल स्तंभ
खूप वर्षांपूर्वी काही संशोधक इजिप्तमध्ये ऐतिहासिक पुराव्यांच्या शोधात असताना त्यांनी केलेल्या खोदकामात त्यांना एक विशाल स्तंभ सापडला. हा स्तंभ साधारण ४२ मीटर लांब आणि सुमारे १२०० टन वजनाचा आहे. संशोधकांनी म्हटल्याप्रमाणे, या स्तंभाची निर्मिती करताना त्यावर भेगा पडल्या आहेत आणि त्यामुळे या स्तंभाचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. असे असले तरीही हा विशाल स्तंभ कसा उचलला गेला असेल? (Mysterious Places) याविषयीचे उत्तर अजूनही कुणाला सापडलेले नाही.