Mysterious Stepwell : महाराष्ट्रातील ‘ही’ रहस्यमयी विहीर पाहून येईल चक्कर; अद्याप गूढ कायम

Mysterious Stepwell
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mysterious Stepwell) महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहेत जी पाहण्यासाठी कायम पर्यटक येत असतात. अगदी लांबून लोक मोठ्या उत्सुकतेने ही ठिकाणे पहायला येतात. ज्यामध्ये काही ऐतिहासिक वास्तू तर काही पुरातन भव्य इतिहास असलेल्या ठिकांणांचा समावेश आहे. आज आपण महाराष्ट्रातील अशाच एका ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण तसेच रहस्यमयी ठिकाणाविषयी माहिती घेणार आहोत. जगात जर्मनी आणि भारतात परभणी… हे उगाच म्हटलं जात नाही. परभणीत एक अशी रहस्यमयी विहीर आहे जिचे गूढ आजपर्यंत कुणीच उलगडू शकलेलं नाही. याच विहिरीविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

परभणीची रहस्यमयी विहीर (Mysterious Stepwell)

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात वालूर नावाचे एक गाव आहे. या गावात वेलूर बारव अर्थात वेलूरची एक अत्यंत प्राचीन पायविहीर आहे. या विहीरीची रचना अतिशय गूढ आणि तितकीच आकर्षक आहे. या विहिरीत आठ बाजूने चक्राकार पद्धतीने फिरत तळाशी जाणाऱ्या पायऱ्या आहेत. ज्या नुसत्या पाहूनच चक्कर येते. मग उतरायचं लांबच राहील. या विहिरीची रचना ३२.२ फूट लांब, ३०.८ फूट रुंद आणि ३२ फूट खोल अशी आहे. ही विवाहित कुणी बांधली? का बांधली? याबाबत कुणालाही माहित नाही. त्यामुळे या विहिरीच्या बांधकामाचे रहस्य आजही उलघडलेले नाही.

विहिरीत डोकावताच येते चक्कर

परभणीतील ही पायविहीर अत्यंत प्राचीन असून तिचे बांधकाम फारच गूढ स्वरूपाचे आहे. (Mysterious Stepwell) विशेष म्हणजे, या विहिरीच्या पायऱ्यांचा आकार हा नदीतील पाण्याच्या भोवर्‍याप्रमाणे वाटतो. अगदी पाण्यात वावटळ यावं आणि पाणी गोलगोल फिरावं असंच काहीसं वाटत. यामुळे विरीहीत डोकावून पाहताचा चक्कर येते किंवा डोळे गरगरू लागतात.

८ आकड्याची कमाल

परभणीच्या वालूर गावातील ही बारव म्हणजेच पायविहीर तिच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधकामामुळे कायम चर्चेत असते. ही वास्तू प्रचंड आकर्षक आणि तितकीच रहस्यमयी आहे. कारण, या विहीरीची रचना अतिशय गूढ आहे. माहितीनुसार, वालूर गावाला तंत्रविद्येची पार्श्वभूमी आहे. ज्याचा खास प्रभाव या बारव अर्थात पायविहिरीवर दिसून येतो.

(Mysterious Stepwell) या विहिरीच्या बांधकामाची खासियत सांगायची म्हणजे, विहीरीच्या बांधकामात ८ आकाड्याची कमाल अनुभवता येईल. या विहिरीत आठ बाजूने उतरणार्‍या पायर्‍या, आठ देवकोष्ट अशी काहीशी खास रचना आहे. या विहिरीचे बांधकाम त्याची शैली आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहता सुमारे १ ते दीड हजार वर्षांपूर्वी केले असेल असा अंदाज इतिहास तज्ञांनी लावला आहे.