हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mysterious Story) जगभरात अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्यांच्या विषयी जाणून तुम्हाला कुतूहल म्हणजे काय? याची जाणीव होत असेल. यातील अनेक गोष्टींमागे विविध इतिहास, विविध रहस्य दडली आहेत. ज्याचा शोध विज्ञान घेत असूनही अद्याप हाती काहीच आलेले नाही. अशाच एका अनोख्या आणि रहस्यमय दगडाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. हा दगड अत्यंत भव्य आहे. इतका भव्य की त्याला आजपर्यंत जागेवरून कुणीच हलवू शकलेलं नाही. त्यामुळे हा दगड शतकांपूर्वी ज्या ठिकाणी होता आजही त्याच ठिकाणी आहे. अशा या न हलणाऱ्या दगडाचे रहस्य जाणून घेऊया.
कुठे आहे हा भव्य दगड?
चेन्नईपासून 55 किलोमीटरवर असलेल्या महाबलीपुरम या ठिकाणी हा भला मोठा दगड आहे. या दगडाचे वजन तब्बल २५० टन आहे आणि तो ज्या पद्धतीने उभा आहे ते पाहून तो कधीही घरंगळेल असं वाटतंय. मात्र, गेल्या १२०० वर्षांपासून तो एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलाय. (Mysterious Story) आजपर्यंत हा दगड कुणीच किंचितही हलवू शकलेलं नाही, हेच या दगडाचं वैशिष्ट्य आहे. एका अजब पद्धतीने हा दगड उभा आहे. ज्याला पाहून हा अजून पडला कसा नाही? असा प्रश्न मनात तयार होतो. असं म्हणतात की, हा दगड अगदी इंग्रजांच्या काळापासून जिथे होता आजही तिथेच आहे.
७ हत्तींचं बळसुद्धा पडलं अपुरं (Mysterious Story)
लोक सांगतात की, इंग्रजांच्या काळात या दगडाला हलवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले गेले होते. प्रत्येकाचे प्रयत्न असफल ठरतात पाहून १९०८ साली मद्रासी गव्हर्नर आर्थर यांनी काही करून हा दगड हलवायचा असे ठरवले. हा दगड ज्या पद्धतीने उभा होता ते पाहून तो कधीही घरंगळत जाऊ शकतो आणि लोकांचा जीव घेऊ शकतो असे वाटणे फार साहजिक होते. त्यामुळे गव्हर्नर आर्थर यांनी शेवटी ७ हत्तींना कामाला लावलं. (Mysterious Story) मात्र आश्चर्याची बाब अशी की, सात हत्तींनी आपलं पूर्ण बळ लावल्यानंतरसुद्धा हा दगड काही त्याची जागा सोडायला तयार नव्हता. या घटनेनंतर मात्र सर्वत्र या दगडाची जोरदार चर्चा रंगली.
देवाचा दगड
माणसांनी, प्राण्यांनी प्रयत्न करून झाल्यानंतर हा दगड हलत नाही हे शेवटी सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर स्थानिक लोक याला वन-इरईकल म्हणजेच ‘आकाशातल्या देवाचा दगड’ असे संबोधू लागले. (Mysterious Story) तर संपूर्ण देशभरात आणि देशाच्या बाहेर या दगडाला ‘कृष्णाच्या लोण्याचा गोळा’ म्हणून ओळखू लागले. या दगडाबद्दल असं सांगितलं जात की, कृष्णाने हा लोण्याचा गोळा त्याच्या बालवस्थेत तिथे सोडला होता आणि म्हणून तो त्याची जागा सोडायला तयार नाही.
वैज्ञानिकांनाही धक्का
दगड आपली जागा सोडत नाही हे समजल्यानंतर विविध दंतकथा सांगितल्या जाऊ लागल्या. कुणी ‘आकाशातल्या देवाचा दगड’ म्हणत होतं. तर कोणी ‘कृष्णाचा लोण्याचा गोळा’. दरम्यान, विज्ञान मात्र या गोष्टींना मान्य करायला काही तयार नव्हतं. त्यामुळे अनेक लोकांनी या दगडाबाबत संशोधन करण्याचा प्रयत्न केला. (Mysterious Story) मात्र, त्यांच्या हाती अशी कोणतीच माहिती लागली नाही. ज्यामधून हे समजेल की हा दगड इथे आला कसा? आणि इतका स्थिर तसेच स्थान राखून कसा काय उभा राहिला आहे? हे कोडं तेव्हाही सुटलं नव्हतं आणि आजही सुटलेलं नाही.