व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Naagin फेम मौनी रॉयचा HOT लूक सोशल मीडियावर व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2007 मध्ये अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलेल्या नागिन फेम हॉट लूक असणारी अभिनेत्री मौनी रॉय हि एकता कपूरच्या गाजलेल्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत पहिल्यांदा झळकली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले. नागिन फेम मौनी रॉय सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही हॉट लूकचे फोटो शेअर केले आहेत. ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Mouni Roy

बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय सिनेमांच्या बरोबरच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस अवताराने सोशल मीडियावर चाहत्यांना अपडेट देताना दिसते. अभिनेत्री मौनी रॉयने टीव्ही इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Mouni Roy

मौनी रॉय लवकरच ब्रह्मास्त्र या चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर ती तिच्या फॅशन सेन्सने नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच, तिचा एक जबरदस्त लूक समोर आला आहे, ज्यामध्ये ती एक छोटा टॉप परिधान करून तिची परिपूर्ण फिगर दाखवताना दिसत आहे.

Mouni Roy

मौनीने तिचे एक ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर अपलोड केले आहे. मोनीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्रीला पाहण्यासाठी उत्सुक असलेले तिचे चाहतेही या फोटोंवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Mouni Roy

सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली मौनी रॉय तिची प्रत्येक घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान, लग्नानंतर मोनीचा हा बोल्ड लूक लोकांना पसंत पडत आहे.व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये मोनी बागेत बसलेली दिसत आहे.

या दरम्यान, तिने खूप उंच स्लिट आणि डीपनेक ड्रेस घातला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत. मौनीने लूकबरोबरचअनेक हॉट पोझ दिल्या आहेत. 2018 मध्ये पहिल्यांदा बॉलिवूड चित्रपटात काम केलेल्या मौनी रॉयची टीव्ही जाहिराती, टीव्ही मालिका आणि सोशल मीडियावरील प्रमोशन, चित्रपट याद्वारे मोठी कमाई होत आहे.