हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | NABARD Recruitment 2024 नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे एका भरतीची अधिसूचना प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे आता इच्छुकांनी अजिबात वेळ नाही वाया न घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. या भरती अंतर्गत तुम्हाला नाबार्डमध्ये नोकरी करण्याची संधी मिळू शकते. ही भरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. नाबार्डकडून या भरतीच्या अधिसूचना देखील जाहीर करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरती अंतर्गत नाबार्डमध्ये अधिकारी (NABARD Recruitment 2024) होण्याची संधी तुमच्याकडे आहे. नाबार्ड ही एक राष्ट्रीय बँक आहे. त्यामुळे तुम्हाला बँकेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळेल. 30 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही या तारखेला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचा आहे.
शैक्षणिक पात्रता | NABARD Recruitment 2024
या भरती अंतर्गत तुमची मुलाखत त्याचप्रमाणे चाचणी देखील होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आणि वयाची अट लागू केली आहे. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे उमेदवार हा 45 वयोगटापर्यंत असणे गरजेचे आहे. केवळ याच उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
यासाठी तुम्हाला नावाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. लक्षात ठेवा 30 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.