NABARD recruitment 2024 | राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंकेअंतर्गत भरती सुरु, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

NABARD recruitment 2024  | राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत एक मोठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे आता बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी संधी आहे. 17 फेब्रुवारीपासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 31 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

त्यामुळे आता या नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. आणि त्यानंतर तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. आता नेमकी कोणत्या पदांसाठी किती रिक्त जागा आहेत. याची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

रिक्त पदे तपशील

  • मुख्य तंत्रज्ञान अधिकारी – 1
  • प्रकल्प व्यवस्थापक- अनुप्रयोग व्यवस्थापन – 1
  • लीड ऑडिटर – 2
  • अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक – 1
  • वरिष्ठ विश्लेषक – सायबर सुरक्षा ऑपरेशन्स – 1
  • जोखीम व्यवस्थापक – क्रेडिट जोखीम – 2
  • जोखीम व्यवस्थापक- मार्केट जोखीम – 2
  • जोखीम व्यवस्थापक- ऑपरेशनल जोखीम – 2
  • जोखीम व्यवस्थापक – IS आणि सायबर सुरक्षा – 2
  • सायबर आणि नेटवर्क सुरक्षा विशेषज्ञ – 2
  • डेटाबेस आणि ऑपरेटिंग सिस्टीम विशेषज्ञ – 2
  • IT पायाभूत सुविधा आणि बँकिंग विशेषज्ञ – 2
  • अर्थशास्त्रज्ञ – 2
  • क्रेडिट अधिकारी – 1
  • कायदेशीर अधिकारी – 1
  • ETL विकसक -1
  • डेटा सल्लागार – 1
  • व्यवसाय विश्लेषक -1
  • पॉवर BI अहवाल विकसक – 1
  • विशेषज्ञ – डेटा व्यवस्थापन -1
  • आर्थिक समावेशक सल्लागार (तांत्रिक) – 1
  • आर्थिक समावेशक सल्लागार (बँकिंग) – 1

वयोमर्यादा | NABARD recruitment 2024

या लोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा ही 45 ते 62 वर्षे या दरम्यान असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे केवळ या वयोगटातीलच उमेदवारी या पदासाठी अर्ज करू शकतात.

नोकरीचे ठिकाण

वरील सर्व पदांकरिता नेमणूक झाली तर मुंबई हे नोकरीचे ठिकाण असणार आहे.

अर्ज शुल्क

  • एससी, एसटी, पीडब्ल्यूडी यामध्ये असणाऱ्या उमेदवारांना या अर्ज प्रक्रियेसाठी केवळ 50 रुपये शुल्क असणार आहे.
  • त्याचप्रमाणे इतर कॅटेगिरीतील उमेदवारांना 800 रुपये अर्जाची शुल्क असणार आहे.

अर्ज प्रक्रिया

  • इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज भरताना त्यामध्ये सगळी माहिती भरणे खूप गरजेचे आहे.
  • ही माहिती जर पूर्ण नसली तर हा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • या अर्जासह बाकी सगळी कागदपत्र जोडणे खूप गरजेचे आहे.
  • उमेदवारांना अंतिम तारखेच्या आधी अर्ज करणे गरजेचे आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 मार्च 2024 आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रिया संपण्याआधी तुम्हाला अर्ज करावा लागेल अन्यथा तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.