Nagpur Pune Summer Special Train : नागपूर-पुणे उन्हाळी स्पेशल ट्रेन आठवड्यातून 3 दिवस धावणार; पहा संपूर्ण वेळापत्रक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि उपराजधानी नागपूर हि दोन्ही शहरे महत्वाची आहे. दोन्ही शहरामधून प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. नागपूरहून पुण्याला शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जाणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. मात्र आता उन्हाळा असून उन्हाळ्याच्या या सुट्टीत नागपूर ते पुणे प्रवास आरामदायी व्हावा आणि प्रवासाची अडचण येऊ नये म्हणून रेल्वेकडून उन्हाळी स्पेशल ट्रेन (Nagpur Pune Summer Special Train) सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी आठवड्यातून २ दिवस हि ट्रेन धावेल असं सांगण्यात आलं होते, मात्र आता नागपूर-पुणे उन्हाळी स्पेशल ट्रेन आठवड्यातून ३ दिवस धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.

18 एप्रिलपासून सुरु होणारी नागपूर ते पुणे सुपरफास्ट समर स्पेशल (गाडी क्रमांक 01165) आता आठवड्यातून तीन दिवस धावेल, 13 जूनपर्यंत दर गुरुवारी ही ट्रेन निघेल आणि एकूण ९ ट्रिप करेल. त्यानंतर पुणे ते नागपूर सुपरफास्ट समर स्पेशल (गाडी क्र. ०११६६) आठवड्यातून तीन दिवस धावेल, १९ एप्रिलपासून १४ जूनपर्यंत हि ट्रेन दर शुक्रवारी आणि एकूण नऊ ट्रिप करेल. या रेल्वेगाड्यांच्या रचनेत (Nagpur Pune Summer Special Train) एकूण 18 LHB डब्यांचा समावेश आहे, ज्यात दोन AC-2 टियर, 10 AC थ्री-टायर इकॉनॉमी, लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह पाच सामान्य द्वितीय श्रेणी आणि एक जनरेटर कार यांचा समावेश आहे

कोणकोणत्या स्थानकांवर थांबा मिळणार – Nagpur Pune Summer Special Train

नागपूर ते पुणे सुपरफास्ट समर स्पेशल ट्रेन (Nagpur Pune Summer Special Train) उरुळी, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकावर थांबेल. या उन्हाळी विशेष गाड्यांची बुकिंग १३ एप्रिलपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.