जागतिक महिला दिनी अनोखा सोहळा ! साताऱ्यात 70 हून अधिक मुलींचं एकाचवेळी नामकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साताऱ्यात अनोख्या अशा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटूंबातील 70 हून अधिक मुलींचा नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमास भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती.

सातारा येथील राधिका संकुलात महिला दिनाचे औचित्य साधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवारातील 70 हून अधिक मुलींच्या बारशाचा कार्यक्रम भाजप महिला मोर्चाच्या वतीने उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमास सुनिशा शहा, सुरभी भोसले, सुवर्णा पाटील, माजी नगरसेवक विकास भोसले, विठ्ठल बलशेटवार आदींची उपस्थिती होती. यावेळी चित्रा वाघ यांनी उपस्थित महिलांसोबत नामकरण सोहळ्यात सहभाग घेतला.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/530684079192204

यावेळी हातामध्ये दोरी पकडत बारशाची गाण्यांनी राधिका संकुल गुंजून उठले. यावेळी चित्र वाघ यांनी उपस्थित महिला भाजप कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. त्या म्हणाल्या की, एक दिवस महिला संपावर गेल्यातर काय होईल याची कुणी कल्पना करू शकत नाही. महिलांना देवत्व देऊ नका; पण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मात्र नक्की द्या. आगामी काळात महिला आर्थिक स्वावलंबी कशी होईल, यासाठी महिला माेर्चा काम करेल. महिला जोपर्यंत आर्थिक सक्षम होत नाही तोपर्यंत तिचे सक्षमीकरण होऊ शकत नाही.

unique ceremony on Women's Day satara

केंद्र सरकारच्या माध्यमातून सातारा महिलांतील कर्तृत्वाला वाव देणार आहे. लहान मुलांचे बारसे करताना एक ते दोन वर्षांच्या नामकरण न झालेल्या मुलींचेही बारसे झाले. 52 मुलींचे बारशाचे नियोजन होते; पण 70 हून अधिक मुलींची बारशी झाली.

या उपक्रमामुळे खूप आनंद होत आहे. यावेळी नवजात मुलींना भेटवस्तू, पालकांना पोशाख करण्यात आले. हळदी-कुंकू व वाणवाटप सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत मुलींच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली.