कराड | कराड शहरातील हेड पोष्ट कार्यालयाजवळील चौकास माजी नगरसेवक कै. प्रभाकर बळवंतराव पवार यांचे नाव देण्यात आले. प्रभाकर पवार यांच्या स्मृती फलकाचे श्रीमती अनिता पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्रभाकर पवार यांनी 1991 ते 95 याकाळात नगरसेक पद भूषिवले होते.
कराड शहरासह परिसरात नागरी विकासाबरोबरच सेवाभावी कार्यक्रम राबवून लोकांची सेवा केली. त्यांच्या नेतृत्वात अंजंठा युवक मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व शिवजयंती उत्सव साजरे खरताना सामाजिक ऐक्य व बंधूभाव वाढीचे कौतुकास्पद कार्य केले. क्रीडा क्षेत्रातही त्यांचे योगदान पहायला मिळाले. हॉलीबॉल, शूटिंगबॉल, ज्युडो कराटे, शरीरसौष्ठव आशा क्रीडा स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजनही केले होते.
लोकांच्या अडीअडचणी सोडवणे. यथाशक्ती मदत करणे. नम्र स्वभाव यागुणांमुळे, त्यांच्यावर प्रेम करणारांची मोठी संख्या कराड- पाटण तालुक्यात पहायला मिळते. प्रभाकर पवार सर्वांचेच लाडके होते. त्यांच्या स्मृती निरंतर जपण्यासाठी अजंठा युवक नवरात्र व गणेशोत्सव मंडळ, गजानन नाट्य मंडळ, नटराज गणेश मंडळ, ओम गणेश मंडळ, आपले गणेश मंडळ, उदयकला गणेश मंडळ, सन्मित्र गणेश मंडळ, अक्षय प्रभाकर पवार मित्रमंडळ व परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन चौकाचे कै. प्रभाकर बळवंतराव पवार असे नामकरण केले. यावेळी बबनराव तारळेकर, वसंत देवाडिगा, दिलीप कणसे, विजय भंडिया, सपंत सुर्यवंशी, विजय खंडेलवाल, संजय पवार, रामभाऊ बाकडे, संदीप मुंढेकर, श्रीकांत घोडके, नुरमोहम्मद शेख, सचिन धुळप, विशाल बेडके, श्रीकांत टिकोळे, प्रशांत जानुगडे, दिपक जगताप, जितेंद्र जाधव, दत्तात्रय पोळ, दादासाहेब पोळ, गणेश काशिद आदिंची उपस्थिती होती.