Namo Bharat Rapid Rail : वंदे मेट्रोचे नाव बदलले, आता नमो भारत रॅपिड रेल म्हणून ओळखली जाणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज प्रथमच भारतात लाँच झालेल्या वंदे मेट्रोचे नाव बदल्यात आलं आहे. रेल्वे विभागाने याबाबत निर्णय घेतला आहे. आता हि रेल्वे नमो भारत रॅपिड रेल (Namo Bharat Rapid Rail) म्हणून ओळखली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथे वंदे भारत मेट्रोचे उद्घाटन केले. तत्पूर्वी या रेल्वेच्या नामकरणाचा सोहळा पार पडला. आता वंदे भारत मेट्रो ट्रेन नमो भारत रॅपिड रेल म्हणून ओळखली जाईल. हि ट्रेन भुज-अहमदाबाद मार्गावर धावेल.

नमो भारत रॅपिड रेल्वेच्या माध्यमातून राज्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित केलं जाईल तसेच पारंपारिक गाड्यांना वेगवान पर्याय देणे आणि शहरातील व्यस्त मार्गावरील गर्दी कमी करण्यात येईल. नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन अंतर्गत हा प्रकल्प डेव्हलप करण्यात आला आहे. या नव्या नमो भारत रॅपिड रेलमुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा आनंद तर घेता येईलच आणि त्यांचा वेळ वाचण्यास सुद्धा मदत होईल.

कस आहे वेळापत्रक – Namo Bharat Rapid Rail

दरम्यान, अहमदाबाद आणि भुज या शहरांदरम्यान धावणारी नमो भारत रॅपिड रेल आठवड्यातून सहा दिवस प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. ट्रेन क्रमांक 94801 असलेली अहमदाबाद-भुज नमो भारत रॅपिड रेल अहमदाबादहून शनिवार वगळता दररोज 17:30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 23:10 वाजता भुजला पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक ९४८०२ भुज-अहमदाबाद वंदे मेट्रो भुज येथून रविवार वगळता दररोज ०५.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी अहमदाबादला १०.५० वाजता पोहोचेल. या रेल्वेला साबरमती, चांदलोडिया, विरमगाम, ध्रांगध्रा, हलवड, समखियाली, भचौ, गांधीधाम आणि अंजार स्थानकावर थांबा मिळेल.

काय आहेत मेट्रोची वैशिष्ट्ये-

नमो भारत रॅपिड रेल (Namo Bharat Rapid Rail) मध्ये 12 वातानुकूलित डबे, स्वयंचलित स्लाइडिंग दरवाजे, मॉड्यूलर इंटीरियर, एलईडी लाइटिंग, व्हॅक्यूम इव्हॅक्युएशनसह शौचालये आणि मार्ग नकाशे आहेत. तसेच पॅनोरॅमिक खिडक्या, सीसीटीव्ही, फोन चार्जिंग सुविधा आणि अलार्म सिस्टम आणि एरोसोल आधारित अग्निशामक प्रणालीसह स्वयंचलित धूर/आग शोधण्याची सुविधा यांसारखी आधुनिक वैशिष्टये या रेल्वेमध्ये पाहायला मिळतात.