कराडला युवा महोत्सावात नाना पाटेकर साधणार युवकांशी संवाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने 42 व्या सातारा जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 14 रोजी सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात संपन्न होत आहे. यावेळी जेष्ठ अभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर हे युवकांशी संवाद साधणार आहेत.

या युवा महोत्सवाचे प्रमुख अतिथी नाना पाटेकर असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा युवा महोत्सव संपन्न होत आहे. या युवा महोत्सवात दि. 14 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत नृत्य, नाट्य, संगीत, कला यांची उधळण होणार आहे. या युवा महोत्सवाला कराड, पाटणसह सातारा जिल्ह्यातील युवा वर्गाने हजेरी लावावी असे आवाहन सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन राजमाने यांनी केले आहे.

या महोत्सावात युवा वर्गाच्या कला- गुणांना वाव देण्यासाठी आयोजन केले जाते. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे युवा महोत्सव होत असल्याने तरूण- तरूणीच्यात उत्साहाचे वातावरण आहे. युवा वर्गाच्या अंतर्गत गुणांना वाव देणारा हा मेळावा कराडच्या एसजीएम काॅलेजमध्ये होणार आहे. यासाठी काॅलेज व्यवस्थापनाकडून तयारी सुरू आहे.