Nana Patole Accident : नाना पटोलेंच्या गाडीचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात (Nana Patole Accident) झाला आहे. नाना पटोले यांच्या गाडीला ट्रकने मागून धडक दिली. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं असून नाना पटोले थोडक्यात बचावले आहेत. निवडणुकीच्या काळातच हा अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

गाडीचा चक्काचूर – Nana Patole Accident

याबाबत अधिक माहिती अशी कि, नान पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा आटपून रात्रीच्या सुमारास घरी परतत होते. त्याच दरम्यान, भिलेवाडा गावाजवळ त्यांच्या गाडीला ट्रकनं जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती कि, नाना पटोले हे ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. मात्र सुदैवानं या अपघातामध्ये (Nana Patole Accident) नाना पटोले आणि गाडीतील इतर प्रवाशांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

या अपघातानंतर पोलिसाना माहिती देण्यात आली. पोलिसांकडून या अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र ट्रकचं नित्रंयण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. भरधाव ट्रक ताफ्यात घुसून हा अपघात झाला आहे. मात्र नाना पटोले थोडक्यात बचावल्याने मोठा अनर्थ टळला.