Nano Fertilizer Subsidy | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘नॅनो खता’साठी केंद्र सरकार देणार 50 टक्के अनुदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Nano Fertilizer Subsidy | शेती करताना खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आपली एखादी चूक देखील महागात पडू शकते. आणि आपल्या शेतीचे नुकसान होऊ शकते.नआपण शेतीतील पीक चांगले यावे त्याचप्रमाणे कीटकनाशकांचा नाश व्हावा, यासाठी रासायनिक खते यांचा वापर करतो. अनेकवेळा या खतांचा आपल्याकडून अतिवापर होतो. आणि आपल्या जमिनीचा पोत बिघडतो. जमिनीचा बिघडल्यामुळे मृदा, हवा, पाणी या गोष्टीच्या प्रदूषणाची देखील शक्यता असते. त्यामुळे जमिनीचा पोत खराब होऊ नये, यासाठी सरकारकडून नॅनो खतांचा (Nano Fertilizer Subsidy) वापर करावा असे सांगण्यात आलेले आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने नॅनो खतांबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांना हे खत स्वस्त दरात मिळावेत, म्हणून केंद्र सरकार 6 जुलै रोजी एक योजना चालू करणार आहे. या योजनेअंतर्गत नॅनो खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान देखील दिले जाणार आहे.

केंद्रीय मंत्री अमित शहा हे या योजनेचे उद्घाटन करणार आहेत. 6 जुलै रोजी ते गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहे.त्या ठिकाणी ते अनेक कार्यक्रमात ही योजना ते सार्वजनिक रित्या सांगणार आहेत. नॅनो खतांचा (Nano Fertilizer Subsidy) जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. आणि वायू, मृदा आणि पाण्याचे प्रदूषण कमी झाले पाहिजे. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

6 जुलै रोजी होणार योजनेचे उद्घाटन | Nano Fertilizer Subsidy

या योजनेच्या माध्यमातून आता आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना नॅनो खतांच्या खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान शेतकऱ्यांना 50 टक्क्यांपर्यंत दिले जाणार आहे. या योजनेचे नाव AGR 2 असे असणार आहे. गुजरातच्या गांधीनगरमधून ही योजना चालू केली जाणार आहे.

100 दिवसांची विशेष मोहीम

या योजनेसाठी सरकारकडून खत निर्मिती करणाऱ्या सहकारी कंपन्यांच्या प्रसार केला जात आहे. या नॅनो खतांचा वापर वाढावा, यासाठी 100bदिवसांची विशेष मोहीम देखील राबवली जाणार आहे. यामधून ते शेतकऱ्यांना नॅनो खतांचा वापर आणि त्याचे फायदे सांगणार आहे